डोंबिवली रेल्वेस्थानकावर प्रवाशांसह पोलिसांनी वाचवले मायलेकाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:02 AM2020-02-17T01:02:54+5:302020-02-17T01:03:09+5:30
रेल्वेस्थानकातून शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फलाट क्र मांक ३ वर मंगला
डोंबिवली : प्रवाशांच्या गर्दीमुळे कोसळलेली एक महिला आणि तिचा मुलगा प्लॅटफॉर्मवरून धावत्या लोकलखाली सापडण्याच्या बेतात असतानाच, प्रवासी आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांचे जीव वाचवले. डोंबिवली रेल्वेस्थानकावर शनिवारी ही घटना घडली.
रेल्वेस्थानकातून शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फलाट क्र मांक ३ वर मंगला सोनावणे त्यांच्या दोन मुलांसह पोहोचल्या होत्या. लोकल येताच त्यांनी मोठ्या मुलाला लोकलमध्ये चढवले. मात्र, लोकलला गर्दी असल्याने लहान मुलासह त्यांना लोकलमध्ये चढता आले नाही. याचदरम्यान लोकल सुरू झाल्याने तोल जाऊन मंगला आणि त्यांचा मुलगा खाली पडले. ते दोघे फलाट व लोकलमधील गॅपमध्ये जात असताना प्रवासी आणि त्या ठिकाणी उपस्थित आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ खेचून बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर लोकलने पुढे निघून गेलेल्या त्यांच्या मोठ्या मुलाला कोपर येथे उतरवण्यात आले. त्याला डोंबिवली आरपीएफ कार्यालयात आणून महिलेच्या स्वाधीन केले.