कोरोनाचे नियम न पाळल्यास ठाण्यात जमावबंदी, पोलीस आयुक्तांनी दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 07:07 AM2021-02-19T07:07:16+5:302021-02-19T07:07:48+5:30

CoronaVirus News in Thane : उपनगरी रेल्वेसेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी काही वेळांकरीता सुरु झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.

Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | कोरोनाचे नियम न पाळल्यास ठाण्यात जमावबंदी, पोलीस आयुक्तांनी दिला इशारा

कोरोनाचे नियम न पाळल्यास ठाण्यात जमावबंदी, पोलीस आयुक्तांनी दिला इशारा

Next

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांंनी केले आहे. रुग्णसंख्या अशीच वाढली तर मात्र सध्या लागू केलेल्या कलम १४४ ची म्हणजेच जमावबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा इशाराही फणसळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
उपनगरी रेल्वेसेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी काही वेळांकरीता सुरु झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्याचबरोबर भाजीबाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक याठिकाणीही गर्दी वाढू लागली आहे. बस आणि रिक्षांमधूनही सर्रास जादा प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. मास्कशिवाय, प्रवेश नाही असा फलक बसवर असला तरी अनेक प्रवासी हे रिक्षा आणि बसमधून विनामास्क फिरतात. नागरिकांमधील गांभीर्य कमी होत असल्यामुळेच कोरोना डोके वर काढत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कलम १४४ ची अंमलबजावणी तीव्रपणे केली जाणार आहे. सध्या या कलमानुसार पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी आहे. पण, यामध्येही रेस्टॉरन्ट, बॅक्वेट हॉल अशा ठिकाणी शिथिलता आहे. सध्या सिनेमागृह, बॅक्वेट हॉल हे क्षमतेच्या ५० टक्के अनुमतीने सुरु केले आहेत. लग्न समारंभालाही १०० पेक्षा जास्त पाहुणे मंडळीना अनुमती नाही. लोकहितासाठी नियम पाळण्याचे आवाहन फणसळकर यांनी केले.

Web Title: Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.