आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:37 AM2021-03-08T04:37:40+5:302021-03-08T04:37:40+5:30

भिवंडी : शहरातील वऱ्हाळादेवी तलावात उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांच्या ...

Police save life of suicidal woman | आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचविले प्राण

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचविले प्राण

Next

भिवंडी : शहरातील वऱ्हाळादेवी तलावात उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांच्या सतर्कतेने जीवनदान मिळाले आहे. महिलेला आत्महत्येपासून रोखून तिचे प्राण वाचविलेल्या या दोन्ही पोलिसांचे कौतुक होत आहे.

लक्ष्मी व्यंकटराजन अनडम (३७) असे आत्महत्या करण्यापासून रोखलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला पती व मुलांसह पद्मानगर येथील बाबूशेठ चाळ येथे राहात असून, घरात पती व मुलांच्या त्रासाला कंटाळून ती रविवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वऱ्हाळादेवी तलावात उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. याच वेळी या परिसरात गस्तीवर असलेले शहर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई राहुल पवार व संजय कोळी यांनी या महिलेस पाण्यात उडी मारण्यापूर्वीच अडवले व तिला आत्महत्या करण्यापासून रोखले. महिलेस शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता पती व मुलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली. महिलेच्या पतीने दुसरा विवाह केल्याची शंकाही या महिलेने व्यक्त केली असून, या महिलेची समज पोलिसांनी काढली असून, घरातील व्यक्तिंनाही समज देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

पवार व कोळी यांचे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच शहरवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आम्ही आमचे कर्तव्य बजावले असून, एका महिलेचा जीव जाण्यापासून वाचविले असल्याने समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया पोलीस शिपाई पवार यांनी दिली.

===Photopath===

070321\20210307_134948.jpg

===Caption===

भिवंडीत आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला पोलिसांच्या सतर्कतेने मिळाले जीवनदान

Web Title: Police save life of suicidal woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.