वेश्या व्यवसाय चालवणारे दलालच खातात बक्कळ दलाली तर पीडित तरुणीला मात्र नाममात्र मोबदला 

By धीरज परब | Updated: August 25, 2023 13:36 IST2023-08-25T13:34:30+5:302023-08-25T13:36:15+5:30

विरार मधील महिला साथीदारास अटक केली आहे . 

police search brokers who runs the prostitution business one arrest | वेश्या व्यवसाय चालवणारे दलालच खातात बक्कळ दलाली तर पीडित तरुणीला मात्र नाममात्र मोबदला 

वेश्या व्यवसाय चालवणारे दलालच खातात बक्कळ दलाली तर पीडित तरुणीला मात्र नाममात्र मोबदला 

लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - वेश्या व्यवसाय चालवणारे दलालच बक्कळ दलाली खाऊन पीडित तरुणीला मात्र नाममात्र मोबदला टेकवत असल्याचा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने केलेल्या कारवाईत आढळून आला आहे . पोलिसांनी गोव्यातील दलालचा शोध चालवला असून त्याच्या विरार मधील महिला साथीदारास अटक केली आहे . 

गोव्यात राहणारा  भूषण ढवळे हा वेश्या व्यवसाय चालवणारा दलाल त्याच्या दोन मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातृन पुरुष ग्राहकांना वेश्यागमनासाठी व्हॉट्सअप द्वारे तरुणींचे फोटो पाठवतो . कॉलिंग आणि चॅटिंग द्वारे पसंत पडलेल्या तरुणीचा सौदा ठरवून तिला महिला साथीदारा सोबत लॉज वर पाठवतो . गोवा , पुणे , लोणावळा , मुंबई आणि मीरा भाईंदर - वसई विरार भागात लॉज बुक करायला लावून २५ हजार मोबदल्यात तरुणी पुरवतो अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना मिळाली . 

पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक मार्फत ढवळे शी संपर्क साधून वेश्यागमनाचा २५ हजारात सौदा नक्की केला . त्याची साथीदार मेघना गुरुनाथ पाटील ( २४ ) रा .राजा अपार्टमेंट , गांधी चौक , विरार पूर्व  हि जीसीसी क्लब जवळ दोन तरुणींना घेऊन आली . गिऱ्हाईका कडून २५ हजार रुपये घेताच पोलीस निरीक्षक अहिरराव सह उमेश पाटील , विजय निलंगे, रामचंद्र पाटील, चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, अश्विनी भिलारे, शितल जाधव यांच्या पथकाने तिला पकडले . 

पीडित २ तरुणींची सुटका करून मेघनाच्या चौकशीत २५ हजार मधून १४ हजार ५०० रुपये भूषणची तर ८ हजार तिची दलाली रक्कम होती . वेश्यागमनासाठी जाणाऱ्या तरुणीला २ हजार तर पसंत न पडलेल्या तरुणीला प्रवास भाडे म्हणून ५०० रुपये ठरल्याचे समोर आले . काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . ढवळेचा शोध सुरु आहे . 

Web Title: police search brokers who runs the prostitution business one arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.