Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला, ठाणे पोलिसांना सतर्कतेचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 12:34 PM2022-06-21T12:34:13+5:302022-06-21T12:53:08+5:30

Maharashtra Political Crisis: राज्य राखीव दलाची तुकडी देखील एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे. 

Police Security has been increased outside Eknath Shinde's house, alert has been issued to Thane police | Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला, ठाणे पोलिसांना सतर्कतेचा आदेश

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला, ठाणे पोलिसांना सतर्कतेचा आदेश

Next

ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि नगरसेवक हे देखील नॉट रिचेबल असून सर्व नेते पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत.  एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर राज्य राखीव दलाची तुकडी देखील एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदे अन्य आमदारांसोबत सुरतमधील ली मेरिडिअन हॉटेलमध्ये असून आता ठाण्यातील पोलिसांना देखील सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मोबाईल बंद असल्याचे आढळून आले आहे. 

शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी मिळत नाही, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामांना हा निधी दिला जातो. यावेळी आमदारांना विश्वासातही घेतले जात नाही. याच्या तक्रारी उद्धव ठाकरेंकडे केल्यावर त्याची दखलही घेतली जात नाही, अशा तक्रारी शिवसेना आमदारांच्या होत्या. या साऱ्या वातावरणातच राज्यसभेला शिवसेनाचा उमेदवार पडला, याची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री पोहोचलेल्या आमदारांमध्ये रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल हे आहेत. या आमदारांना शिंदे यांनी मोठया प्रमाणात विकासनिधी दिला आहे. दुसरीकडे राजन विचारे, रविंद्र फाटक हे ठाण्यातच आहेत. प्रताप सरनाईक यांचा फोन मात्र नॉट रिचेबल येत आहे.  

Read in English

Web Title: Police Security has been increased outside Eknath Shinde's house, alert has been issued to Thane police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.