ठाण्यात ६० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:36 PM2019-08-30T22:36:31+5:302019-08-30T22:41:27+5:30
ठाण्याच्या आनंदनगर येथे बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या अन्बलगन मुर्तूवर (२८, रा. मुंबई) याला १०० रुपयांच्या ६० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे: बनावट नोटा चलनात वटविण्यासाठी आलेल्या अन्बलगन गणेशन मुर्तूवर (२८, रा. कमलानगर, धारावी, मुंबई)
या ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट ५ ने २९ आॅगस्ट रोजी अटक केली आहे. त्याच्याकडून १०० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ६० हजारांच्या ६०० बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
एक व्यक्ती बनावट नोटा चलनात वटविण्यासाठी आनंद नगर परिसरात येणार असल्याची युनिट-५ च्या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने सापळा रचून अन्बलगन मुर्तूवर गुरुवारी अटक केली. त्याचा साथीदार विष्णू हा गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. या दोघांना बनावट नोटा छापून देणारा मारी मणी रा. मुंबई अशा तिघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.