मास्कचा वापर न करणाऱ्या ३४४ बेफिकिर नागरिकांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 09:44 PM2021-02-23T21:44:50+5:302021-02-23T21:54:33+5:30

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाºया ३४४ जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या ११२ ठिकाणी जनजागृतीही पोलिसांनी सुरु केली आहे.

Police take action against 344 unsuspecting citizens who do not wear masks | मास्कचा वापर न करणाऱ्या ३४४ बेफिकिर नागरिकांवर पोलिसांची कारवाई

प्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात

Next
ठळक मुद्दे१२६ हॉटेल आणि दुकान चालकांना नोटीसप्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाºया ३४४ जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच १२६ मंगल कार्यालय, हॉटेल आणि दुकानदार आस्थापनांनाही नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पोलिसांना सतर्कतेच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने नियम न पाळणाºयांवर कारवाईची मोहीम सुरु केली आहे. विशेषत: मास्क परिधान न करणाºया ३४४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचबरोबर कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन करणाºया सात जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच १२६ मंगल कार्यालय, हॉटेल आणि दुकानदार आस्थापनांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच नियम डावलून घेतल्या जाणाºया बैठकांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली असून आतापर्यंत पाच ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात केली आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या ११२ ठिकाणी जनजागृतीही पोलिसांनी सुरु केली आहे. तसेच दुकान, हॉटेल आणि इतर अस्थापनांमधील कामगारांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक केले आहे. नियम न पाळणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.

‘‘ कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, सर्वांनीच वैयक्तिक जबाबदारी समजून खबरदारी घेतली पाहिजे. ठाणे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाºया ३४४ जणांविरुद्ध ठाणे कारवाई केली आहे. कारवाई आणि आजार टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे.’’
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त , ठाणे शहर
 

 

 

 

Web Title: Police take action against 344 unsuspecting citizens who do not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.