पोलीस बंदोबस्तात झाला भूमिपूजन सोहळा

By admin | Published: April 19, 2017 12:23 AM2017-04-19T00:23:21+5:302017-04-19T00:23:21+5:30

पालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या व अतिक्रमण होऊ नये म्हणून आरएनए मलनिस्सारण केंद्राजवळील जागेच्या सुशोभीकरणास महापालिकेने मंजुरी दिली

The police took control of Bhumi Pujan Soula | पोलीस बंदोबस्तात झाला भूमिपूजन सोहळा

पोलीस बंदोबस्तात झाला भूमिपूजन सोहळा

Next

मीरा रोड : पालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या व अतिक्रमण होऊ नये म्हणून आरएनए मलनिस्सारण केंद्राजवळील जागेच्या सुशोभीकरणास महापालिकेने मंजुरी दिली असताना दुसरीकडे आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू फेडरेशनने मात्र कामास विरोध केल्याने वाद निर्माण झाला. या वादाला शिवसेना विरुध्द भाजपा असा रंग असल्याची चर्चाही रंगली. अखेर मोठ्या पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यानेच खासदार, आमदार आदींच्या उपस्थितीत भूमिपूजन केले.
मीरा रोडच्या आरएनए ब्रॉडवे वसाहतीसह नव्याने झालेल्या आरएनए लिबर्टीजवळ विकासकाने मलनिस्सारण केंद्र बनवले होते. ते नियमित चालवले जात नसल्याने अखेर ते पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. रहिवाशांसह अन्य नागरिकांनीही पालिकेस केंद्र ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने महासभेत ठराव देखील झाला.
दरम्यान केंद्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेवर बेकायदा बांधकामे झाली. या अतिक्रमणामागे भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याच्या नावाची चर्चा आहे. या अतिक्रमणा विरोधात महापालिकेने दोन - तीन वेळा कारवाई करत बांधकाम पाडले. तरी देखील काही भागात अतिक्रमण कायम आहे.
अतिक्रमण कायमचे हटवून या जागेचे सुशोभीकरण करुन रहिवाशांसाठी मिनी उद्यान बनवण्याची मागणी नगरसेविका वंदना चक्रे यांनी जुलै २०१६ पासून महापालिकेकडे केली होती. अखेर चक्रे यांच्या नगरसेवक निधीतून या ठिकाणी पाच लाख खर्चून कुंपणभिंत, मिनी उद्यान व त्यात बसण्यासाठी बाकडे बसविण्यास पालिकेने मंजुरी दिली. निविदा मंजूर करून केवळ कार्यादेश देणे बाकी असल्याचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी चके्र यांना पत्राद्वारे कळवले.
सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी खासदार राजन विचारे व आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होते. परंतु आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू फेडरेशनने या ठिकाणी तारेचे कुंपण टाकून ती जागा आमची असल्याचे फलक लावले. तसेच पोलीस व महापालिकेस पत्र देऊन सुशोभिकरणाच्या कामास विरोध करत व आंदोलनाचा इशारा दिला.
दरम्यान, काम व कार्यक्रम रद्द व्हावा म्हणून भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी अधिकाऱ्यास फोन केल्याचे वृत्त आले आणि शिवसेना विरुध्द भाजपा असा सामना रंगला. मेहतांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सजी आयपी यांनी ही जागा रहिवासांच्या मालकीची असून रहिवासी उद्यान विकसित करतील अशी भूमिका घेतली. जागेत प्रवेश व भूमिपूजन केल्यास सर्वांवर गुन्हा दाखल करू असे त्यांनी सांगितले.
कार्यकारी अभियंता खांबित यांच्या हस्ते भूमिपूजन करायला लावून खासदार विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांनी वाद टाळण्याचा प्रयत्न केला. रहिवाशांना विश्वासात घ्या, गैरसमज दूर करून काम सुरु करा अशी भूमिका त्यांनी घेतली. या वेळी माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, उपमहापौर प्रवीण पाटील, नगरसेविका वंदना चक्रे, अरुणा चक्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The police took control of Bhumi Pujan Soula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.