शाळांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी घेतली शिक्षकांची ‘शाळा’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:00 PM2024-08-30T22:00:14+5:302024-08-30T22:00:27+5:30
प्रत्येक शाळेवर महिला पोलिसांची राहणार करडी नजर: अघोरी शिक्षा करणाऱ्यांवर उगारणार कायद्याची ‘छडी’
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बदलापूरातील दोन अल्पवनयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर आल्यानंतर आता ठाणे पोलिसांनीही शाळांमधून विद्या्ी्र, शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या समुपदेशनाचे वर्ग सुरु केले आहेत. शाळांमध्ये सखी सावित्री समिती असावी, शालेय कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली जावी तसेच एक तक्रार पेटीही असावी, सीसीटीव्ही असावेत. तक्रारपेटीतील गंभीर तक्रार पोलिसांना कळविण्यात यावी. तसेच एक महिला पोलिस हवालदार एका शाळेच्या संपर्कात राहिल, अशा अनेक सूचना ठाण्यातील शाळांमध्ये पोलिसांनी केल्याची माहिती नौपाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प्रिया ढाकणे यांनी शुक्रवारी दिली.
अलिकडेच नौपाडयातील एका शाळेच्या शिक्षिकेने शाळेत मुलाने वही न आणल्याबद्दल त्याच्या डोक्यात पट्टीने प्रहार केला होता. अशा अघोरी शिक्षा करणाºया शिक्षकांवर कायद्याची छडा उगारली जाणार असल्याचा इशाराही ढाकणे यांनी दिला.
बदलापूर ष्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर परिमंडळातील नौपाडा, कळवा, मुंब्रा, कोपरी, राबोडी, डायष्घर आदी पोलिस ठाण्यांच्या शाळांमध्ये पोलिसांनी भेटी देऊन त्याठिकाणी प्रत्यक्ष मुले आणि मुलींशी संवाद सुरु केला आहे. त्यांना गुड आणि बॅडटच बद्दल माहिती दिली जाते. ठाणेनगरमधील गौतमी विद्यालयात सहायक पोलिस निरीक्षक सपना ताटे, नौपाडयात न्यू इग्शिल स्कूलमध्ये सहायक पोलिस निरीक्षक स्वाती लहाने तर राबोडीतील श्रीरंग विद्यालयात उपनिरीक्षक सोनाली अहिरे आणि सोनी शेट्टी यांनी विर्द्याी आणि शिक्षकांशी गुरुवारी आणि शुक्रवारी संवाद साधला.
..................
काय म्हणाल्या सहायक पोलिस आयुक्त -
नौपाडा विभागाच्या सहायक आयुक्त प्रिया ढाकणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी गुरुवारी नौपाडा पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक आणि शिक्षकांची बैठक घेतली. यावेळी शाळांमध्ये सुरक्षेच्या काटेकोर उपाययोजना कराव्यात,
सीसीटीव्ही बसवावेत, सफाई करणाऱ्या महिला आणि पुरुष कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी करावी. तक्रार पेटी ठेवून ती रोड उघडली जावी. गंभीर तक्रार असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. शाळेत सखी सावित्री समिती तयान करुन त्यामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा. कोणीही मुलांना अघाेरी शिक्षा केल्यास किंवा लैंगिक शोषणासारख्या घटना आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
काय आहे शाळांचे म्हणणे-
शाळांच्या बाहेर फिरणारे टवाळखोर मुले, रोडरोमियो यांच्यावरही कारवाई व्हावी. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी याकडेही लक्ष द्यावे. शाळांमध्ये होणाऱ्या पालक सभेच्या वेळी पोलिस कर्मचारी असल्यास त्यांच्याही अडचणी जाणून घेता येतील. शिक्षक आणि शाळांच्याही समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आले.