रिकाम्या पाण्याच्या बाटलीवरुन पोलिसांनी काढला ९९ लाख रुपयांचा कपडा चोरी करणाऱ्या चोरट्याचा माग

By नितीन पंडित | Published: January 14, 2023 08:30 PM2023-01-14T20:30:58+5:302023-01-14T20:31:08+5:30

चोरीस गेलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

police traced thief from an empty water bottle, who stole clothes worth Rs 99 lakh | रिकाम्या पाण्याच्या बाटलीवरुन पोलिसांनी काढला ९९ लाख रुपयांचा कपडा चोरी करणाऱ्या चोरट्याचा माग

रिकाम्या पाण्याच्या बाटलीवरुन पोलिसांनी काढला ९९ लाख रुपयांचा कपडा चोरी करणाऱ्या चोरट्याचा माग

googlenewsNext

भिवंडी : शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील एका गोदामात आठ जानेवारी रोजी झालेल्या एका चोरीच्या घटनेचा तपास करीत असताना निजामपुरा पोलिसांनी घटनास्थळावर मिळालेल्या रिकामी पाण्याची बाटली व चिप्स पॉकेट्सचे रॅपर यावरून चोरट्याचा माग काढला. पोलिसांनी चोराला अटक करून चोरीस गेलेले ९९ लाख ३९ हजार २६० रुपये किमतीचा कपडा व पाच हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

परशुराम सरवदे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिठपाडा खोणी येथे ऍडोन एक्स्पोर्ट कंपनीचे गोदाम असून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे शर्ट,पॅन्ट,टीशर्ट,पडद्याचा कपडा,पॅन्टच्या पॉकेटला लावण्यात येणार कपडा,सलवार सुटचा कपडा व पुर्ण बनलेला कपडा ठेवलेला असताना ८ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्याने या गोदामातून मालाची चोरी झाली होती.

या घटनेनंतर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक या चोरीच्या घटनेचा तपास करत असताना घटनास्थळी रिकामी पिण्याच्या पाण्याची बाटली व वेफर्सची रिकामे रॅपर आढळून आले.आरोपीने चोरी करीत असताना तेथील सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुद्धा चोरी केलेला असल्यामुळे त्याबाबतचा कोणताही पुरावा चोरट्याने मागे ठेवलेला नव्हता. पोलीस पथकाने पाण्याची रिकामी बाटली व वेफर्स रिकामे रॅपर परिसरातील कुढल्या दुकानातून खरेदी केलेले आहे याबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली.

त्यामध्ये एका हॉटेलमधली ही बाटली असल्याचे समजले तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये गुन्हेगार परशुराम सरवदे हा पाण्याची बाटली खरेदी करताना आढळून आला.त्या अनुषंगाने पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय मारणे,पोलीस उपनिरी सचिन कुंभार,सहाय्यक पोलीस उपनिरी सुनील सूर्यवंशी,पोलीस कर्मचारी अल्लाड,शंकर निवळे,सुशीलकुमार धोत्रे,नीलकंठ खडके,इब्राहिम शेख, सोनावणे,सांबरे, आटपाडकर,कोळी,अनिल सापटे,विजय ताठे या पोलीस पथकाने घटनास्थळा वरील डम डाटा वरून आरोपी हा अंजुरफाटा साठे नगर या ठिकाणी असल्याची माहिती निष्पन्न झाल्यानंतर पोलीस पथकाने त्यास सापळा रचून अटक केली आहे.

आरोपी परशुराम सरवदे याने आपल्या इतर तीन ते चार साथीदारांसह ही चोरी केल्याचे कबूल केले असून गुन्ह्यातील मुद्देमाला अंजुर दिवे येथील एका गोदामात दडवून ठेवल्याचे समजल्यावरून या ठिकाणी जाऊन निजामपुरा पोलिसांनी चोरीस गेलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: police traced thief from an empty water bottle, who stole clothes worth Rs 99 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.