पोलिसांची विचार करण्याची पद्धत सकारात्मक व संवेदनशील व्हावी: डॉ . सहस्त्रबुद्धे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 02:54 PM2022-10-19T14:54:06+5:302022-10-19T14:55:32+5:30

मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागात पोलिसांच्या गृहसंकुल आदी साठी सुमारे साडेपाच एकरचा भूखंड शासनाने पोलिसांना हस्तांतरित केला आहे.

police way of thinking should be positive and sensitive said dr vinay sahasrabuddhe | पोलिसांची विचार करण्याची पद्धत सकारात्मक व संवेदनशील व्हावी: डॉ . सहस्त्रबुद्धे 

पोलिसांची विचार करण्याची पद्धत सकारात्मक व संवेदनशील व्हावी: डॉ . सहस्त्रबुद्धे 

googlenewsNext

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - पोलिसांच्या विचारांची पद्धत सकारात्मक व संवेदनशील झाली पाहिजे . पोलीस आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करतात तशीच पोलिसांच्या आयुष्याची गुणवत्ता वाढवण्याची जबाबदारी केवळ सरकार वर सोडून होणार नाही.  तर समाज व लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदचे अध्यक्ष डॉ . विनय सहस्त्रबुद्धे यांनी मीरारोड येथील पोलिसांच्या कार्यक्रम वेळी केले . 

मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागात पोलिसांच्या गृहसंकुल आदी साठी सुमारे साडेपाच एकरचा भूखंड शासनाने पोलिसांना हस्तांतरित केला आहे . त्याठिकाणी बहुउद्देशीय इमारत , जॉगिंग ट्रॅक , खुली व्यायामशाळा कामांचे भूमिपूजन मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी डॉ . सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , पोलीस आयुक्त सदानंद दाते , महापालिका आयुक्त दिलीप ढोले , अपर पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त अमित काळे व विजयकांत सागर, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता मधुकर खरात, सहायक पोलीस आयुक्त विलास सानप आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी , माजी नगरसेवक , नागरिक आदी उपस्थित होते . उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . 

मेट्रोच्या कामा मुळे भाईंदर पश्चिम येथील अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे कार्यालय तोडण्यात येत असल्याने एमएमआरडीए पोलिसाना सदर ठिकाणी लहानशी इमारत बांधून देणार आहे . तर सहस्त्रबुद्धे हे राज्यसभा खासदार असताना त्यांच्या खासदार निधी मधून ८५० मीटरचा जॉगिंग ट्रॅक व खुली व्यायामशाळा मंजूर करण्यात आली होती. 

यावेळी सहस्त्रबुद्धे म्हणाले कि , पोलीस अधिकारी - कर्मचारी , पोलीस खाते यांच्या बद्दल समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा असतात. ती परिस्थिती चांगली व्हावी , बदलावी अशी सर्वांचीच इच्छा असते . पण ती कशी बदलावी याचे चिंतन करणारे अधिकारी म्हणजे सदानंद दाते . ते विचार करणारे व विचार लिहणारे अधिकारी असून त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक वाचले कि त्यांच्या अनुभवाचा परीघ किती मोठा आहे याची कल्पना येईल .

पोलिसांना चांगली घरे मिळावी, त्यांना तब्येत चांगली राखता यावी, त्यांची विचार करण्याची पद्धत सकारात्मक व संवेदनशील व्हावी यासाठी सर्वच सरकार प्रयत्न करत असतात . पोलीस ठाणी सर्व सुविधा युक्त अशी आधुनिक बनवावी लागतील . सदर बहुउद्देशीय इमारतीत ग्रंथालय असावे ज्यामुळे वाचनाने पोलिसांचे विचारधिक समृद्ध होतील व त्याचा लाभ पोलीस खात्याला व समाजाला होईल. त्यासाठी १ हजार पुस्तकं आपण उपलब्ध करून देऊ असे सहस्त्रबुद्धे म्हणाले .

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: police way of thinking should be positive and sensitive said dr vinay sahasrabuddhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.