भातचोरीचा तपास लावण्यास पोलिसांची चालढकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:28 AM2019-06-09T00:28:40+5:302019-06-09T00:29:16+5:30
संडे अँकर । सहा महिन्यांपूर्वीची घटना : आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप
मुरबाड : शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य सरकार हमीभावाने खरेदी करते. ही खरेदी आदिवासी विकास महामंडळ, खरेदी-विक्री संघ यांच्या माध्यमातून केली जाते. तालुक्यात माळ आदिवासी सहकारी संस्था व दूधनोली आदिवासी सहकारी संस्थांमार्फत भाताची खरेदी केली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून महामंडळाच्या माध्यमातून धान्यखरेदी केली जात आहे. आजपर्यंत या संस्थांनी जेथे जागा मिळेल, त्या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू केली होती.
काही ठिकाणी तर गाव, वस्तीपासून दोन ते चार किलोमीटर दूर खरेदी केंदे्र असताना कधीही महामंडळाच्या भाताची चोरी झाली नव्हती. मात्र, प्रथमच माळ केंद्रातील ५०० गोण्यांची चोरी झाली आहे. या घटनेला सहा महिने होऊनही पोलिसांना चोरांचा माग घेता आला नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महामंडळाचे अधिकारी आम्हाला योग्य माहिती देत नाहीत व भेटतही नाहीत. त्यामुळे तपास करण्यात अडचण येत आहे. याबाबत, वारंवार महामंडळाच्या अधिकाºयांकडे चौकशी करतात. परंतु, त्यांच्याकडून माहिती दिली जात नाही. त्यामुळे या चोरांना पोलीस पाठीशी घालतात की महामंडळाचे अधिकारी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर शहापूर कार्यालयात या. फोनवर माहिती देता येणार नाही.
- विनय एडके, उपप्रादेशिक अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ
महामंडळाच्या गोदामातून भाताची चोरी झाली आहे. याची तक्र ार टोकावडे पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, किती भात चोरीला गेला आहे, याची योग्य माहिती महामंडळाचे अधिकारी देत नाहीत व ते आमच्याशी संपर्कसाधत नाहीत. त्यामुळे तपास कसा करणार. - सुहास खरमाटे, सहायक पोलीस निरीक्षक
आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातून भाताची चोरी झाली आहे. याबाबत टोकावडे पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे. मात्र, पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही.
- वाल्मीकी आव्हाड, व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ