आजाराला कंटाळून पोलिसाची आत्महत्या
By admin | Published: October 16, 2015 03:47 AM2015-10-16T03:47:16+5:302015-10-16T03:47:16+5:30
गेल्या काही महिन्यांपासून क्षयग्रस्त असलेल्या अनंत सावंत (५६) या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली
ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून क्षयग्रस्त असलेल्या अनंत सावंत (५६) या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ठाणे पूर्व, अष्टविनायक चौक येथील ‘प्राची’ सोसायटीत ते वास्तव्याला होते. ते नायगावच्या पोलीस मुख्यालयात नेमणुकीला होते. दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने त्यांनी मे २०१५ पासून वैद्यकीय रजाही घेतली होती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. यात ते प्रचंड वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांनी गुरुवारी सकाळी स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.
त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अथवा त्यांच्या घरी कोणतीही चिठ्ठी मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)