लसीकरणाचे राजकीय मार्केटिंग थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:37+5:302021-07-07T04:49:37+5:30

ठाणे : ठाणे महापालिकेच्या मोफत लसीकरणावर मागील काही दिवसांपासून राजकीय मार्केटिंग सुरू होते. या राजकीय मार्केटिंगवरून लोकमतमध्ये वृत्त ...

The political marketing of vaccinations will stop | लसीकरणाचे राजकीय मार्केटिंग थांबणार

लसीकरणाचे राजकीय मार्केटिंग थांबणार

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या मोफत लसीकरणावर मागील काही दिवसांपासून राजकीय मार्केटिंग सुरू होते. या राजकीय मार्केटिंगवरून लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनावरदेखील टीका होऊ लागल्याने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी राजकीय मार्केटिंग थांबवावी, अशी विनंती शहरातील राजकीय पक्षांनी केली आहे. त्यानंतर आयुक्तांनी अशा प्रकारच्या जाहिरातबाजी सुरू असेल ते जाहिरात फलक काढून योग्य ती कारवाई करावी, तसेच त्याचा अहवाल अतिक्रमण उपायुक्त कार्यालयाला सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

अशा प्रकारच्या जाहिरातबाजीतून शनिवारी शिवाई नगर भागात शिवसेनेच्याच दोन नगरसेवकांमध्ये वादावादी झाली होती. तसेच भाजपनेदेखील महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

Web Title: The political marketing of vaccinations will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.