राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झाले निवडणूक कर्मचारी? कळवा-मुंब्रा मतदारसंघातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 07:13 AM2019-10-05T07:13:45+5:302019-10-05T07:14:16+5:30

कळवा-मुंब्रा मतदारसंघामध्ये असलेल्या प्रभाग समिती कार्यालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांची या मतदारसंघाच्या निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली

political party workers become Election workers? Types of Kalwa-Mumbra constituency | राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झाले निवडणूक कर्मचारी? कळवा-मुंब्रा मतदारसंघातील प्रकार

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झाले निवडणूक कर्मचारी? कळवा-मुंब्रा मतदारसंघातील प्रकार

Next

मुंब्रा : कळवा-मुंब्रा मतदारसंघामध्ये असलेल्या प्रभाग समिती कार्यालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांची या मतदारसंघाच्या निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली असून यातील काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोप करून याबाबतची तक्र ार अपक्ष उमेदवार मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूख खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनामध्ये केली आहे.

निवडणुकीचे कामकाज निष्पक्षपणे व्हावे, ठरावीक उमेदवाराला झुकते माप दिले जाऊ नये, यासाठी काही निकष निवडणूक आयोगाने आखून दिलेले आहेत. या निकषांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्थानिक कर्मचाºयाला तो राहत असलेल्या किंवा तो काम करीत असलेल्या मतदारसंघामध्ये निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात येऊ नये, असे निर्धारित करण्यात आलेले आहे. या निकषांनुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या सनदी अधिकाºयांचीही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यापूर्वी बदली करण्यात येते. तसेच मतदारसंघाबाहेरील कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामासाठी बोलावण्यात येतात.

परंतु, मुंब्रा-कळवा मतदारसंघाच्या मतदारसंघाच्या निवडणूक कामांसाठी तैनात केलेल्या कर्मचाºयांपैकी बहुतांश ठाणे महानगरपालिकेच्या कळवा आणि मुंब्रा प्रभाग समितीमध्ये कार्यरत असल्याचे निर्दशनास आले असल्याचा दावा करून याचा गांभीर्याने विचार करून विद्यमान स्थितीमध्ये असलेले कर्मचारी अन्यत्र स्थलांतरित करून पारदर्शी
आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी
अन्य भागांतील कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी खान यांनी केली आहे.
 

Web Title: political party workers become Election workers? Types of Kalwa-Mumbra constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.