नेत्याची मर्जी राखत अधिकाऱ्यांच्या बदल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:57 AM2018-09-01T03:57:37+5:302018-09-01T03:58:05+5:30

भार्इंदर पालिका : दादासाहेब खेत्रे पुन्हा सेवेत

Politicians wanting to exchange the officials? | नेत्याची मर्जी राखत अधिकाऱ्यांच्या बदल्या?

नेत्याची मर्जी राखत अधिकाऱ्यांच्या बदल्या?

Next

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या प्रमुख अधिकाºयांच्या बदल्या आयुक्त बालाजी खतगावकर यांनी केल्या आहेत. एका नेत्याची मर्जी जपत बदल्या झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. एका नेत्याची मर्जी झाल्याने पालिका सेवेतून बाहेर ठेवलेल्या दादासाहेब खेत्रे यांना त्याच नेत्याच्या मर्जीनंतर पुन्हा सेवेत रूजू करून घेत आता महत्वाच्या बेकायदा बांधकाम नियंत्रण प्रमुखपदासह जाहिरात विभाग दिला आहे.

खेत्रे यांच्याकडे परवाना व वाहन विभाग होता. त्या पदावर असलेले संजय दोंदे यांना भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग समिती तीनचे प्रभाग अधिकारी नियुक्त केले असून सोबत परवाना विभाग दिला आहे. येथे प्रभाग अधिकारी असलेले गोविंद परब यांना भार्इंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती दोनमध्ये नेमले आहे. परब हे कामगार सेनेत असल्याने व त्या नेत्याशी संबंधित बांधकामांच्या तक्रारींवर कारवाई करण्यास घेतल्याने त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. तर दोंदे हे त्या नेत्याच्या मर्जीतले मानले जातात.

मीरा रोडच्या प्रभाग पाचचे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांना प्रभाग समिती चारमध्ये सुनील यादव यांच्या जागी नेमले आहे. तर यादव यांना बाजार फी वसुली व अभिलेख विभागात पाठवले आहे. प्रभाग समिती एकचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांना मीरा रोडच्या प्रभाग समिती पाचमध्ये नियुक्त केले असले तरी गोडसे रजेवर असल्यानेच समिती एकचा पदभार परब यांनी तर समिती पाचचा पदभार चंद्रकांत बोरसे यांनी सांभाळायचे आदेश आहेत. प्रभाग समिती दोनचे जगदीश भोपतराव यांना वाहन व पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये नेमले आहे. आस्थापना अधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांना परिवहन उपव्यवस्थापकाचा अतिरीक्त पदभार सोपवला आहे.

आयुक्तांच्या आदेशानुसारच बदल्या केल्या असून यात राजकीय हस्तक्षेप नसतो. पालिकेचे काम प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यकतेनुसार बदल्या केल्या आहेत.
- विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त.

Web Title: Politicians wanting to exchange the officials?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.