भिवंडीत २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत संपन्न 

By नितीन पंडित | Published: October 16, 2022 07:51 PM2022-10-16T19:51:02+5:302022-10-16T19:51:52+5:30

भिवंडीत २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले.

-Polling for 29 Gram Panchayat elections in Bhiwandi has been completed peacefully  | भिवंडीत २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत संपन्न 

भिवंडीत २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत संपन्न 

Next

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील २९ ग्रामपंचतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता शांततेत मतदानास प्रारंभ झाला. या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या निवडणुकी साठी ९८ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. सुमारे ८५ टक्के मतदारांनी हक्क बजावला आहे.दुपारी साडेतीन वाजता पर्यंत ७८.७३ टक्के मतदान झाले होते.

या मतदानानंतर २५ सरपंच पदासाठीच्या ८३ तर २२३ ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या ५७७ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंदीस्त झाले आहे .या सर्व निवडणूक प्रक्रियेवर तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मतदान प्रक्रिया सर्वत्र  व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्था केली होती तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये या करीता भिवंडी तालुका,गणेशपुरी व पडघा पोलिसांचे विशेष पथक मतदान स्थळी तैनात करण्यात आले होते.

 

Web Title: -Polling for 29 Gram Panchayat elections in Bhiwandi has been completed peacefully 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.