कल्याण केडीएमसीच्या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान
By admin | Published: October 26, 2015 12:38 AM2015-10-26T00:38:24+5:302015-10-26T00:38:24+5:30
मतदारांशी संपर्क साधण्याचा योग सर्व पक्षिय उमेदवारांनी प्रचार रॅलीच्या माध्यमातून साधल्याचे दिसून आले. टिटवाळा, कल्याण पूर्व आणि डोंबिवली नजीकच्या सोनारपाडा परिसरात शिवसेना, भाजप आणि
कल्याण केडीएमसीच्या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान होत असल्याने सर्वच उमेदवारांनी शेवटचा रविवार प्रचारासाठी सत्कारणी लावला. मतदारांशी संपर्क साधण्याचा योग सर्व पक्षिय उमेदवारांनी प्रचार रॅलीच्या माध्यमातून साधल्याचे दिसून आले. टिटवाळा, कल्याण पूर्व आणि डोंबिवली नजीकच्या सोनारपाडा परिसरात शिवसेना, भाजप आणि मनसेच्या प्रचारसभा सायंकाळच्या सुमारास पार पडल्या. तर सकाळपासूनच सर्वच पक्षातील उमेदवारांनी स्वत:चा प्रभाग प्रचार रॅली काढून पिंजून काढला.<इफ>रिक्षावर लावलेल्या लाऊडस्पिकरवरून उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात असताना डिजेचा ताल आणि एल ई डी व्हॅन चौकाचौकातील प्रचाराची रंगत वाढवित होती. प्रचारानिमित्त काढल्या गेलेल्या रॅलीत पुरूषांसह महिलांचा सहभाग मोठया प्रमाणावर दिसून आला. प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर येताच काही ठिकाणी मोठा जलसा झाल्याचे पहावयास मिळाले. <इफ>दरम्यान या रॅलींचा फटका वाहतुकीला बसला त्यामुळे काही भागांमध्ये वाहतुक कोंडीचे चित्रही पहावयास मिळाले. सायंकाळी पावसाने काही प्रमाणात शिडकावा झाल्याने प्रचारात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची एकच धांदल उडाल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)<इफ>उमेश जाधव टिटवाळा<इफ>कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात पावसाने आपली अचानक हजेरी लावल्याने नागरिकांसह निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र पळापळ उडाली. वाऱ्या पावसाचा जोर इतका मोठा होता की, मोठ्या प्रमाणात नागरिकांचे व निवडणूक प्रचार कार्यालयांचे नुकसान झाले आहे. दुपारी तीनच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट व वाऱ्या पावसाची जोरदार सुरवात झाली.<इफ>१जवळ जवळ एक तास पावसाने पूर्ण झोडपून काढले. यामुळे सध्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारात मग्न असलेल्या कार्यकर्त्यांची मात्र धावपळ उडाली. या वाऱ्या पावसाचा जोर इतका जोरात होता की, प्रचार कार्यालयांचे मंडप उडाले.काही ठिकाणी लावलेले प्रचाराचे फलक कोलमडून पडले. <इफ>२काही ठिकाणी घरांची छपरे देखील उडाली आहेत. तर काही जागी झाडे ही उन्मळून पडली आहेत. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या अचानक आलेल्या वाऱ्या पावसाचा फटका टिटवाळा शहरासह ग्रामीण भागातील फळेगांव, उशीद, मढ, रूंदे, उतणे, म्हस्कल, गोवेली, गुरवली, निंबवली, बल्याणी, वासुंद्री आदी गावांना बसला.