अंबरनाथच्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस

By पंकज पाटील | Published: December 21, 2022 03:41 PM2022-12-21T15:41:28+5:302022-12-21T15:41:39+5:30

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचे चित्र आज सकाळी पाहायला मिळाले

Pollution foams over Valdhuni river in Ambernath | अंबरनाथच्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस

अंबरनाथच्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस

Next

अंबरनाथ :

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचे चित्र आज सकाळी पाहायला मिळाले अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांमधून या नदीत रासायनिक सांडपाणी सोडले जात असून त्यामुळेच या नदीत हे रासायनिक प्रदूषण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत अनेक वर्षांपासून रासायनिक कारखान्यांकडून सांडपाणी सोडले जाते. या सांडपाण्यामुळे वालधुनी नदीचा रासायनिक नाला झाला असून याचा स्थानिकांना मोठा त्रास होतो. आज सकाळी वालधुनी नदीत प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. वालधुनी नदीत आजवर झालेल्या प्रदूषणानंतर दरवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांची पाहणी केली जाते. आणि त्यानंतर कारखान्यांना नोटिसा बजावल्या जातात. मात्र यानंतर पुन्हा एकदा कंपन्यांकडून राजरोसपणे नदीत रासायनिक सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एकंदरीत कार्यक्षमतेवरच नव्हे, तर विश्वासार्हतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Pollution foams over Valdhuni river in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.