प्रदूषण, कचरा, स्मार्टसिटीवरील प्रकल्प ठरले लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:18 PM2018-12-10T23:18:16+5:302018-12-10T23:18:38+5:30

आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मांडले नागरी समस्यांवरील उपाय; १२ प्रकल्पांचा समावेश

Pollution, garbage, Smartcity projects will be targeted | प्रदूषण, कचरा, स्मार्टसिटीवरील प्रकल्प ठरले लक्षवेधी

प्रदूषण, कचरा, स्मार्टसिटीवरील प्रकल्प ठरले लक्षवेधी

Next

कल्याण : कल्याण आणि डोंबिवली शहरातील कचऱ्याची समस्या, प्रदूषण, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई यांसारख्या विविध समस्यांवर उपाय सूचवणारे प्रकल्प बुधवारी झालेल्या पश्चिमेकडील दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्ट संचालित भाऊ राव पोटे माध्यमिक विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात मांडले होते. या शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिनीबायोगॅस प्रकल्प, पॅराबोलिक सोलर कुकर, वैद्यानिक स्मार्टसिटी, पुनर्चक्रीकरण, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, हायड्रोलिक लिफ्ट असे एकूण १२ प्रकल्प होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव बिपीन पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालिका मीनल पोटे आणि मुख्याध्यापक सुरेश वामन उपस्थित होते. नववीमधील विद्यार्थ्यांनी वेस्ट वॉटर मॅनेजमेंट या प्रकल्पाद्वारे दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते शेती, घरगुती बागेसाठी कसे वापरता येईल याची माहिती उपस्थितांना दिली. पुनर्चक्रीकरण प्रकल्पात पेट बॉटलचे पुनर्चक्रीकरण करून धाग्याची निर्मिती करणारा प्रकल्प मांडला होता.

कल्याण-डोंबिवली शहराला भेडसावणाºया कचरा समस्येवर ‘पुनर्नवीनीकरण ऊ र्जास्रोत’ प्रकल्प उपाय नववीमधील विद्यार्थ्यांनी मांडले. यामध्ये त्यांनी मिनीबायोगॅस आणि पॅराबोलिक सोलर कुकरचा उपयोग प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले. घरगुती ओला कचरा आणि पालेभाज्यांच्या देठाद्वारे तयार होणाºया वायूपासून बायोगॅस तयार केल्यास प्रदूषण कमी होईल, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

‘वैज्ञानिक स्मार्ट सिटी’
कल्याण-डोंबिवलीत स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानुसार वैज्ञानिक स्मार्ट सिटी हा प्रकल्पही प्रदर्शनात मांडला होता. यामध्ये सौरऊ र्जेचा वापर, सायन्स रिसर्च सेंटर, मेट्रो स्टेशन, आर्मी टेÑनिंग सेंटर यांची मांडणी केली होती. अर्चना धात्रक, उज्ज्वला कदम, प्रतिभा वाघचौरे या विज्ञान शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले.

Web Title: Pollution, garbage, Smartcity projects will be targeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.