पुण्याच्या प्रभा नेने ‘सौदामिनी’ पुरस्काराने सन्मानित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 06:12 AM2017-11-06T06:12:11+5:302017-11-06T06:12:17+5:30
गेली १७ वर्षे पुण्यात वाहतूक नियंत्रण करण्यात मोलाचे योगदान देणा-या ८० वर्षीय प्रभा नेने यांना महिला महोत्सवात ‘सौदामिनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ठाणे : गेली १७ वर्षे पुण्यात वाहतूक नियंत्रण करण्यात मोलाचे योगदान देणा-या ८० वर्षीय प्रभा नेने यांना महिला महोत्सवात ‘सौदामिनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना नेने म्हणाल्या की, पुण्यात कचरा आणि वाहतूक या दोन समस्या आहेत. पुण्यात पोलीस बळ कमी आणि पुणेकरांना शिस्त कमी असल्याने मी वाहतुकीकडे वळले. त्यामुळे थोडेसे मार्गदर्शन करावे लागते आणि माझ्या या कामात सातत्य असल्याने त्याला महत्त्व आहे. जिथे कमी तिथे आम्ही, प्रयत्नांती परमेश्वर, बचेंगे तो और भी लढेंगे या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रारंभ कला अॅकॅडमी आयोजित महिला महोत्सवाचा दुसरा दिवस रविवारी गडकरी रंगायतन येथे रंगला. मंगला खाडिलकर यांच्या मनोमनी कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी व अभिनेत्री सुप्रिया पाठारे उपस्थित होत्या.
हट्टंगडी म्हणाल्या की, उतारवयात जुन्या पिढीने पुढच्या पिढीकडे घराची जबाबदारी सशक्तपणे द्यावी. आपल्याप्रमाणेच त्या पिढीने घर सांभाळले पाहिजे, ही अपेक्षा न करता त्यांना त्यांच्याप्रमाणे करू द्यावे, म्हणजे आपल्याला चांगले जगता येईल. साठीनंतरचे वय हे अवघड असते. परंतु, या वयात समाजासाठी वेळ द्या आणि आनंदी-सुखी आयुष्य जगा, असा सल्ला त्यांनी दिला.
पाठारे म्हणाल्या की, हा महिला महोत्सव म्हणजे एका महिलेने दुसºया महिलेसाठी केलेले मोठे काम आहे. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते, मंजिरी चुणेकर, भटू सावंत, डॉ. मैत्रेय शाहा यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. मैत्रेय शाहा यांच्या वतीने त्यांचा पुरस्कार डॉ. ऊर्मिला कुमावत यांनी स्वीकारला.
प्रारंभ कट्टा अर्थात ‘गप्पा मनातल्या मनमोकळ्या’ याअंतर्गत अभिनेते अजय पुरकर आणि ३५
वर्षे एकत्र कुटुंबात राहणाºया घरकुलाच्या प्रतिनिधी सुचिता सावंत यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत अॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी घेतली. त्यानंतर, कॉमेडीची बुलेट ट्रेन-फेम संदीप गायकवाड याचा कॉमेडी
शो झाला. त्याने रसिकांना पोट
धरून हसवले. डॉ. मेधा मेहेंदळे
यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. पंकज पाडाळे दिग्दर्शित नृत्याविष्काराचा आस्वाद रसिकांनी घेतला. कार्यक्रमाला पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, सर्वांगीचे सर्वेसर्वा कृष्णा भानगे उपस्थित होते.