भिवंडीतील चिंचोटी मानकोली महामार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:43+5:302021-09-22T04:44:43+5:30
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलने देखील केली आहेत. मात्र प्रत्येक आंदोलन वेळी ...
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलने देखील केली आहेत. मात्र प्रत्येक आंदोलन वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व टोल कंपनी नागरिकांना रस्ता लवकरात लवकर दुरुस्तीचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगतात. आंदोलन स्थगित झाल्यानंतर रस्त्याची थातूरमातूर दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनी आपले हात झटकते .
सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा रस्त्याबाबत दुर्लक्षित धोरणामुळे स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येत सर्वपक्षीय गाव विकास संघर्ष समिती स्थापन केली असून या संघर्ष समितीने १८ ऑगस्ट रोजी या महामार्गावर कामण, खारबाव, कालवार व अंजुरफाटा अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलने केली. त्यांनतर रस्त्याच्या दुरुस्तीचा देखावा कंपनीमार्फत करण्यात आला. आता पुन्हा या रस्त्याची दुरवस्था झाल्याने खारबाव नाक्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे टोल वसूल करणाऱ्या कंपनी बरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार का याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.