टायरखरेदीसाठी आखडता हात
By admin | Published: February 17, 2017 02:00 AM2017-02-17T02:00:34+5:302017-02-17T02:00:34+5:30
एरव्ही कार्यक्रम वा अन्य तातडीची गरज म्हणून आगाऊ रक्कम देणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेने टायरखरेदीसाठी मात्र हात आखडता
मीरा रोड : एरव्ही कार्यक्रम वा अन्य तातडीची गरज म्हणून आगाऊ रक्कम देणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेने टायरखरेदीसाठी मात्र हात आखडता घेतला आहे. तर, टायरखरेदीच्या तांत्रिक माहितीची निविदाही अद्याप उघडण्यात आलेली नाही. तर, दुसरीकडे टायरअभावी बस बंद पडण्याची संख्याही वाढत आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून पालिकेचे उत्पन्नही बुडत आहे.
टायरची ६० हजार किलोमीटरपर्यंतची क्षमताही संपुष्टात आली आहे. यामुळे टायर फुटण्याचे, फाटण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु, पालिकेने टायरखरेदीसाठी चालवलेल्या या घोळात गेल्या वर्षीही टायरअभावी टप्प्याटप्प्याने १६ बस बंद पडल्या होत्या.
पालिकेने टायरखरेदीची तीन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच ३६ टायरअभावी पुन्हा ६ बस बंंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. फेरनिविदा मागवूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर एकमेव आलेली निविदा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
आलेली निविदा उघडण्याचे पत्र परिवहन विभागाने संगणक विभागास दिले आहे. परंतु, आॅनलाइन निविदा उघडण्यासाठी दोन अधिकाऱ्यांनी डिजिटल लॉक उघडणे आवश्यक आहे. परंतु, सध्या उपायुक्त विजयकुमार म्हसाळ कामात व्यस्त असल्याने तांत्रिक माहितीची निविदाच अद्याप उघडलेली नाही. (प्रतिनिधी)