लोकमत इम्पॅक्ट! निकृष्ठ बांधकाम केलेल्या खर्डीच्या शाळेची अखेर गळती रोखली    

By सुरेश लोखंडे | Published: August 7, 2023 06:52 PM2023-08-07T18:52:26+5:302023-08-07T18:52:40+5:30

ठाण्यातील जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियातून शहापूर तालुक्यातील खर्डी येथे अटलबिहारी वाजपेयी आंतररार्ष्टीय शाळा क्र.१ चे जी प्लस वनची इमारत अलीकडेच बांधण्यात आली आहे.

poorly constructed school in Khardi finally stopped leaking in thane | लोकमत इम्पॅक्ट! निकृष्ठ बांधकाम केलेल्या खर्डीच्या शाळेची अखेर गळती रोखली    

लोकमत इम्पॅक्ट! निकृष्ठ बांधकाम केलेल्या खर्डीच्या शाळेची अखेर गळती रोखली    

googlenewsNext

ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियातून शहापूर तालुक्यातील खर्डी येथे अटलबिहारी वाजपेयी आंतररार्ष्टीय शाळा क्र.१ चे जी प्लस वनची इमारत अलीकडेच बांधण्यात आली आहे. मात्र पहिल्या पावसातच या इमारतीला गळती लागली. निकृष्ठ बांधकामामुळे या इमारतीला गळती लागल्याचे वृत्त ऑनलाइन लोकमतने २७ जुलै रोजी प्रसिध्द केले. त्याची दखल घेऊन या इमारतीच्या छतावर पत्राचे शेड बाधून गळती रोखली आहे.

या प्रसिध्द आंतरराष्टीय शाळेच्या इमारतीचे काम गेल्या वर्षी २०२२-२३ मध्ये मंजूर झाले. त्यानंतर बांधकाम जानेवारीमध्ये सुरू करून त्यावर कोटींचा खर्च झाला. पण यंदाच्या पहिल्या पावसाळ्यात या इमारतीचा स्लॅबला गळती लागून विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. यास अनुसरून लोकमतने ‘खर्डीच्या शाळेच्या इमारतीला गळती’ या मथळ्याखाली वृत्ती प्रसिध्द केले. त्याची दखल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेऊन स्लॅबची गळती रोखण्यासाठी त्यावर पत्राचे शेड त्वरीत बांधण्यात आले. त्यामुळे या शाळेच्या शिक्षकांसह गांवकऱ्यांनी लोकमतचे आभार मानले.  

या शाळेला अचानक लागलेल्या गळतीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन पालकांमध्ये भीतीही व्यक्त करण्यात येत होती. ठेकेदाराकडून झालेल्या या निकृष्ठ कामा विरोधात लोकमतने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे लक्ष वेधले आणि या गंभीरस्थितीची दखल घेण्यास भाग पाडले. अवघ्या चार दिवसात ठेकेदाराचा शोध घेऊन त्यास या गळक्या स्लॅबवर तात्पुर्ते पत्राचे शेड बांधण्यास भाग पाडले. या धोकादायक व निकृष्ठ बांधकाम झालेल्या या इमारतीविषयी पालकांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून बांधलेल्या या इमारतीच्या बांधकामाकडे संबंधीतांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अर्थपूर्ण व्यवहार केल्याची चर्चा या गांवकºयांमध्ये जोरधरत आहे.

Web Title: poorly constructed school in Khardi finally stopped leaking in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.