युतीचा पेच : जागा वाटपाकडे इच्छुकांचे डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:48 PM2019-09-28T23:48:59+5:302019-09-28T23:49:18+5:30

कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २७ तर, भाजपतर्फे २२ जण इच्छुक असून, त्यांचे डोळे युतीच्या जागा वाटपाकडे लागले आहेत.

poser between Shiv sena & BJP, leader eyes on Seat sharing | युतीचा पेच : जागा वाटपाकडे इच्छुकांचे डोळे

युतीचा पेच : जागा वाटपाकडे इच्छुकांचे डोळे

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २७ तर, भाजपतर्फे २२ जण इच्छुक असून, त्यांचे डोळे युतीच्या जागा वाटपाकडे लागले आहेत. युती जरी असली तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, शिवसेना व भाजपमधील इच्छुकांना युती नको आहे. युतीमुळे त्यांच्या उमेदवारीवर काट मारली जाऊ शकते, अशी भीती इच्छुकांना आहेत. तर विद्यमान आमदारांना युती हवी आहे. त्यात त्यांचा विजय सुकर होणार, अशी राजकीय स्थिती येतील चार विधानसभा मतदारसंघात आहे.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला होता. मोदी पंतप्रधान व्हावेत, यासाठी युतीने कंबर कसली होती. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. मात्र, त्यावेळी शिवसेना-भाजपची युती झाली नव्हती. त्यामुळे राज्यभरात शिवसेना-भाजप यांनी आपले स्वबळ आजमावले होते. त्यामुळे २०१९ ला लोकसभा निवडणुसाठी युती होणार का, याविषयी कूजबुज होती. मात्र, युती झाली. विधानसभेसाठीही युती राहील, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, विधानसभेची निवडणूक येताच युती जरी असल्याचे सांगण्यात येत असले तरी जागा वाटपावर एकमत झालेले नाही.

कल्याण पश्चिम हा मतदारसंघ भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे आहे. मात्र, या मतदारसंघातून शिवसेनेतूनही अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनाला मिळावा, असा दावा केला आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेतून भाजप पुरस्कृत असलेले अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपतर्फे उमेदवारी मागितली आहे. या मतदारसंघातूनही शिवसेनेकडून काही जण इच्छूक आहेत. कल्याण पूर्व शिवसेनाला सोडावा, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

डोंबिवली मतदारसंघातून राज्यमंत्री व भाजप आ. रवींद्र चव्हाण हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि भाजपच्या दोन जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. डोंबिवलीवर भाजपचा दावा आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजप तेथे दावा सांगू शकत नाही. तसेच डोंबिवलीवर शिवसेना दावा सांगू शकत नाही. मात्र, कल्याण पूर्व व पश्चिमवर शिवसेना दावा सांगू शकत नाही. तेथे भाजपचे आमदारांची नाव पुढे करण्यात आले आहे.

ऐनवेळी उमेदवारांची नावे?
चारही मतदारसंघांतून शिवसेना व भाजपचे दावेदार प्रबळ आहेत. जागा वाटपावरून युतीचे गणित फिसकटले तरच त्यांना त्यांच्या इच्छुक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकते.
युती झाल्यावर जे मतदारसंघ शिवसेनेच्या वाटाला येणार नाहीत, त्या मतदारसंघांतून इच्छुक असलेल्यांच्या इच्छेवर पाणी फेरले जाऊ शकते.
दोन्ही पक्षांतील बंडाळी टाळण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला उशिरा जाहीर केला जाऊ शकतो. तसेच अधिकृत उमेदवारांची यादीही ऐनवेळी शेवटच्या क्षणाला २, ३ आणि ४ आॅक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: poser between Shiv sena & BJP, leader eyes on Seat sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.