तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 05:41 PM2022-07-14T17:41:28+5:302022-07-14T17:42:26+5:30

तानसा धरण आसंडुन (overflow) वाहण्याची पातळी १२८.६३ मी. इतकी आहे.

Possibility of overflowing Tansa Dam; Appeal to citizens to be vigilant | तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

googlenewsNext

- हितेंन नाईक

पालघर:  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२८.१७ मी. इतकी असून तानसा धरण आसंडुन (overflow) वाहण्याची पातळी १२८.६३ मी. इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असुन धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरुण वाहण्याची (Overflow) शक्यता आहे.

तरी तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या, आजुबाजुच्या परिसरातील गावांना, रहीवाश्यांना तानसा धरण भरून वाहण्याची (Overflow) कल्पना देण्यात आली असून सावध राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित सर्व शासकिय यंत्रणा, तहसिल कार्यालय, पोलिस यंत्रणा व सर्व संबंधित अधिकारी यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिले.

Web Title: Possibility of overflowing Tansa Dam; Appeal to citizens to be vigilant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.