‘त्या’ पोस्ट लाइक, शेअर करणे येऊ शकते अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:39+5:302021-09-14T04:46:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे सोशल मीडियालाही दोन बाजू आहेत. काही जण व्यक्त ...

Like that post, can be shared anglat | ‘त्या’ पोस्ट लाइक, शेअर करणे येऊ शकते अंगलट

‘त्या’ पोस्ट लाइक, शेअर करणे येऊ शकते अंगलट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे सोशल मीडियालाही दोन बाजू आहेत. काही जण व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा चुकीच्या मार्गाने वापर करतात; असे लोक समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. दिशाभूल करणारी आणि नकारात्मक माहिती सोशल मीडियावरून शेअर केली जाते. दक्षता न बाळगता अशा कोणत्याही पोस्टला लाइक, शेअर आणि फॉरवर्ड करणे आपल्याही अंगलट येऊ शकते. पोस्टची योग्यता आणि समाजावर होणारे परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्हालाही जेलची हवा खावी लागण्याची दाट शक्यता आहे.

सोशल मीडिया लोकप्रियता मिळविण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर, हॅलो, टेलिग्राम, टिकटॉक हे त्याचे प्रमुख फ्लॅटफॉर्म आहेत. अनेक जण वेळ घालविण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करतात. अलीकडच्या काळात स्मार्टफोन अनेकांच्या हाती आला आहे. त्यामुळे या माध्यमांचा वापर सहजशक्य झाला आहे. एकीकडे सोशल मीडियाचा सरकारात्मक वापर सुरू असताना दुसरीकडे काही लोक त्याचा गैरवापरही करताना दिसतात. या मीडियाचा वापर करून अफवा पसरविण्याचे काम करतात. समाजभान नसलेल्या या संबंधित व्यक्ती जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर करतात. फोटो किंवा व्हिडिओ संपादित करून गोंधळ पसरवला जातो. यामुळे कधीकधी दंगे होऊन समाजाचे ऐक्य आणि शांतता भंग होण्याची दाट शक्यता असते. यातील एखादी पोस्ट तुमच्याकडून चुकून शेअर झाली, लाइक किंवा फॉरवर्ड झाली तर तुमच्यावरही माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.

---------------------------------------

सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून

व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या माध्यमांवर आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत. कुठलीही लिंक किंवा मेसेज शेअर करताना त्याचा सारासार विचार करावा. पोस्टचे परिणाम पाहूनच ती पुढे पाठवावी. आपल्याकडे सध्या फेसबूक अकाउंट फेक बनवून पैशांची मागणी करणे, फोटोंचा वापर करून फेक अकाउंटवरून ट्रोल करणे असे प्रकार वाढले आहेत. याबाबतही खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

-----------------------------------------

अशी घ्या काळजी

फेक अकाउंट बनविले असेल तर अशा अकाउंटचा शोध घेऊन त्याचा यूआरएल मागवून घ्यावा.

ओळखीच्या व्यक्तीलाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा आणि परिचित व्यक्तीचीच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारा.

समाजभावना भडकविणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट दुर्लक्षित करा, त्या लाइक अथवा शेअर करू नका.

------------------------------------------

मुलींनो, डीपी सांभाळा!

मुलींनी फेसबुकवर स्वत:चे प्रोफाईल फोटो ठेवू नये, प्रोफाईल लॉक करून ठेवावी तसेच व्हॉट्सॲपवर डीपी ठेवतानाही खबरदारी घ्यावी. जेणेकरून कुणीही आपला प्रोफाईल फोटो किंवा व्हॉट्सॲप डीपी कॉपी करणार नाही. अन्यथा तुमच्या फोटोचा दुरूपयोग होऊ शकतो. टू फॅक्ट ऑथेंटिकेशनचा वापर करून आपले अकाउंट सुरक्षित करता येते.

-------------------------------------------

खबरदारी बाळगणे महत्त्वाचे

एखादी पोस्ट वादग्रस्त असली तर तिला लाइक करणे अथवा ती पोस्ट शेअर करणे चुकीचे आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन शांतता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण एखादी पोस्ट टाकताना खबरदारी बाळगणे महत्त्वाचे आहे. आपल्या पोस्टमुळेही सामाजिक ऐक्याला तडा जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. कुठलीही लिंक किंवा मेसेज शेअर करताना त्याचा सारासार विचार करावा, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते.

- सायबर विभाग

------------------------------------------------------

Web Title: Like that post, can be shared anglat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.