खड्ड्यांचे शहर, ठाणे शहर; सर आली धाउन, ठाण्यातले रस्ते गेले वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 13:07 IST2021-10-01T13:06:00+5:302021-10-01T13:07:12+5:30
पालक मंत्र्यांच्या वार्डमध्येच अशी अवस्था आहे, मग बाकीच्या विभागाचे काय? असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.

खड्ड्यांचे शहर, ठाणे शहर; सर आली धाउन, ठाण्यातले रस्ते गेले वाहून
ठाणे- शहरात ठीक-ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर, येथील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली महानगर पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे इंदिरानगर हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा वार्ड आहे.
पालक मंत्र्यांच्या वार्डमध्येच अशी अवस्था आहे, मग बाकीच्या विभागाचे काय? असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला. एवढेच नाही, तर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि महिला शहर अध्यक्ष ठाणे शहर समीक्षा मार्कन्डे यानी खड्ड्यात रांगोळीदेखील काढल्या.
ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली महानगर पालिकेच्या विरोधात आंदोलन.#MNS#ShivSenapic.twitter.com/HDECNMRdyd
— Lokmat (@MiLOKMAT) October 1, 2021