पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय: ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप

By जितेंद्र कालेकर | Published: July 7, 2024 07:02 PM2024-07-07T19:02:32+5:302024-07-07T19:02:44+5:30

एमएमआरडीएच्या रस्त्यांवर ५०० पेक्षा जास्त खड्डे : खड्ड्यामुळेच पावसाळ्यात जातात बळी, मनसेचा आरोप

potholes on Ghodbunder road at the beginning of rains: Thanekars suffer from traffic jams | पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय: ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप

पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय: ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप

ठाणे: घोडबंदरच्या रस्त्यावरील खड्डयांमुळे अनेक अपघात होत असतानाही घोडबंदर रस्त्याचा दर्जा सुधारण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे घोडबंदर रस्त्यावरून स्पष्ट होत आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्ता हा राज्य महामार्ग असून त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग ,एमएमआरडीए, मेट्रो प्रकल्प तसेच ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून देखभाल केली जाते. सेवा रस्ता ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारित येतो. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी घोडबंदर रस्त्यावरील दुरवस्थेमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून घोडबंदरवर पडलेल्या मोठया खड्ड्यामुळेच पावसाळ्यात नाहक बळी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोप मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.

घोडबंदर मार्गावर नेहमीच वाहतूकीची वर्दळ असते. याचबरोबर पनवेल जेएनपीटी, नाशिक ,अहमदाबाद, राजस्थान येथे जाणारी मालवाहू वाहनेही याच महामार्गावरून जातात. हा रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सर्व प्राधिकारणाची आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावरील अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दरवर्षीॅ हा रस्ता खड्डेमत होत असल्याचे प्रमुख कारण संबंधित प्राधिकरणामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. संबंधित प्राधीकरणाविरोधात वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी तक्रार करूनही प्रशासन कारवाई करीत नसल्याचा नसल्याचा आराेप हाेत आहे. या सेवा रस्त्यावर जागोजागी एमएमआरडीए प्राधिकरणाच्या वतीने खोदकाम केले आहे. पावसाळ्यात मुख्य राज्य महामार्ग वाहतूक कोंडीमध्ये अडकला असल्यास सेवा रस्त्याच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांमार्फत केले जात होते. पण त्यालाही एमएमआरडीएच्या नियोजनाअभावी ब्रेक लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घोडबंदर रस्त्यावर संबंधित सर्व प्राधिकरणाने रस्त्याची कामे व्यवस्थितरित्या करून घेणे अपेक्षित असते. वषार्नुवर्षे ही कामे योग्यरित्या होत नसल्यामुळे रस्ता पावसाळ्यात खड्डेमय झाला आहे. तर या मार्गावरील एमएमआरडीए, एमएसआरडीसीच्या वतीने सांभाळण्यात येणाऱ्या बहुतेक पूलांवर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक संतगती होत असून अपघाताच्या घटनाही दररोज समोर येत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेणे आवश्यक
घोडबंदर रस्ता हा राज्य महामार्ग आहे. मुख्यमंत्री ठाणे जिल्हयाचे असूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष हाेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित क्षेत्रात येणारे रस्ते महानगरपालिकेला हस्तांतरण करून त्यांनी ते सांभाळणे, असे सूचित केले आहे. तरीही ही कामे केली जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभाग, महाराष्ट्र नवनिमार्ण सेना, मनसे

 

Web Title: potholes on Ghodbunder road at the beginning of rains: Thanekars suffer from traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.