बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन

By पंकज पाटील | Published: August 29, 2022 08:22 PM2022-08-29T20:22:39+5:302022-08-29T20:25:30+5:30

बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मूर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो.

Potholes on the road of Barvi Dam Arrival and immersion of Ganesha from this road | बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन

बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन

Next

बदलापूरःबदलापुरातून बारवी डॅमकडे जाणारा एमआयडीसीचा रस्ता हा सर्वांसाठीच डोकेदुखी ठरू लागला आहे. या रस्त्यावर उल्हास नदीचे पात्र असल्याने अनेक गणेश भक्त या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे गणेशाचे आगमन आणि विसर्जन हे खड्ड्यातुनच होणार आहे. तर दुसरीकडे एमआयडीसीचे अधिकारी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. 

     बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मूर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो. बारवी धरणाकडे जाणारा बदलापूर – बारवी धरण रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून डांबरी असलेल्या या रस्त्याची दुरावस्था होते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची प्रतिक्षा आहे. हा रस्ता अंबरनाथ, उल्हासनगरपासून बदलापूर शहर, बदलापूर गाव, अंबरनाथ तालुक्यातील विविध गावे, मुरबाड आणि मुरबाडच्या आसपासच्या गावातील ग्रामस्थांना महत्वाचा आहे. मात्र या रस्त्याच्या कामाकडे कायमच एमआयडीसीने दुर्लक्ष केले आहे. 

या रस्त्याला गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. राज्यभरात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांवरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिथे खड्डा दिसेल तिथे बुजवा असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र एमआयडीसी प्रशासनाने आदेशानंतर एकदाच खड्ड्यांची भरणी करून रस्ते सोडून दिले. त्यानंतर पडलेल्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले. मात्र त्या खड्ड्यांकडे एमआयडीसी प्रशासनाने लक्ष्य दिले नाही. बदलापूर शहरातील वालिवली, एरजांड भागातून जाणाऱ्या या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. वालिवली चौकात रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. 

विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीचे अधिकारी रोज याच रस्त्याने बारवी धरणापर्यंतचा प्रवास करतात. त्यांनंतरही खड्डे बुडजवले जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे. या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आणि त्या ठिकाणी खड्डे भरल्याने गेल्याने आता गणेशाचे आगमन आणि विसर्जन हे दोन्हीही खड्ड्यातूनच करावी लागणार आहे.

 ''या रस्त्याचे पावसाळ्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. तत्पूर्वी तातडीने या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात येणार असून तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. – सुधीर नागे, अधिक्षक अभियंता, एमआयडीसी. 
 

Web Title: Potholes on the road of Barvi Dam Arrival and immersion of Ganesha from this road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.