चिकण माती, खडींनी बुजवले डांबर रस्त्यावरील खड्डे, नागरिकांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 01:18 PM2020-09-14T13:18:11+5:302020-09-14T13:19:48+5:30

वाहनचालकांनी खड्डे बुजवणाऱ्या कामगारांची विचारणा केली असता, उल्हासनगर येथील ठेकेदाराने मनापाचे कंत्राट घेतले असून त्यानूसार खड्डे बुजवण्यात येत असल्याचे सांगितले. 

potholes on roads filled with stones and Clay soil in dombivli | चिकण माती, खडींनी बुजवले डांबर रस्त्यावरील खड्डे, नागरिकांची टीका

चिकण माती, खडींनी बुजवले डांबर रस्त्यावरील खड्डे, नागरिकांची टीका

googlenewsNext

डोंबिवली - वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने मनपाचे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे नियोजन सपशेल कोलमडले आहे. त्यामुळे सर्वत्र डांबराच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून शहरात वाहनांचा वेग मंदावला असून नागरिक हैराण झाले आहेत. अनलॉकडाऊनपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. सोमवारी आकाश ढगाळलेले असतांनाही टिळक पथ मार्गावर चिकण माती, खडींचे मिश्रण करुन खड्डे बुजवण्यात येत होते. त्यासंदर्भात वाहनचालकांनी खड्डे बुजवणाऱ्या कामगारांची विचारणा केली असता, उल्हासनगर येथील ठेकेदाराने मनापाचे कंत्राट घेतले असून त्यानूसार खड्डे बुजवण्यात येत असल्याचे सांगितले. 

डांबरीकरणाच्या रस्त्यावर चिकण मातीचा भराव टाकून काय उपयोग असा सवाल करत नागरिकांनी मनपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. पाऊस सुरु असून आता टाकलेली माती,खडी टिकाव धरणार नाही, असे असतानाही थुकपट्टी लावून बील काढण्याचा प्रकार असल्याची टीका देखील वाहनचालकांनी केली. एवढे करूनही खड्डे मात्र जैसे थे असून टिळक पथ कधीही खड्डे मुक्त झाला नसल्याचे वाहनचालक म्हणाले.

मनपाच्या फ प्रभागाचे उपअभियंता शैलेश मळेकर यांनी यासंदर्भात सांगितले की, त्या रस्त्यावरील खडीकरणाचे काम सुरू असून १ ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर कमी झाला आणि रस्ते सुकले की डांबरीकरण सुरु करून खड्डे बुजवले जाणार आहेत. आता जे काम सुरू आहे, त्याने जेणेकरून वाहने एकदम खड्डयात आपटू नये, अपघात होऊ नये असा सुरक्षिततेचा उद्देश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"मुख्यमंत्र्यांनी ठाणे ग्रामीणच्या अत्यावश्यक सेवेतील कामगारांची केली घोर निराशा"

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान सुरू, हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"

"कोरोना किट खरेदीमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार", आपचा योगी सरकारवर हल्लाबोल

"राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय, डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं?"

Web Title: potholes on roads filled with stones and Clay soil in dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.