ठाणे, पालघरमधील पोल्ट्री व्यावसायिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:42+5:302021-09-07T04:49:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : शेतीला जोडधंदा म्हणून ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकरी कुक्कट पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र, ...

Poultry traders from Thane, Palghar gathered | ठाणे, पालघरमधील पोल्ट्री व्यावसायिक एकवटले

ठाणे, पालघरमधील पोल्ट्री व्यावसायिक एकवटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : शेतीला जोडधंदा म्हणून ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकरी कुक्कट पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र, अनेक अडचणींमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी संघटनात्मक मार्ग काढावा, यासाठी रविवारी अनगाव येथे पोल्ट्री व्यावसायिकांचा मेळावा पार पडला. यावेळी सुमारे ३०० पोल्ट्रीधारक उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, वादळ, महापूर, बर्ड फ्लू, तसेच मागील वर्षांपासून कोरोनामुळे पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पोल्ट्री व्यवस्थापनाचा खर्च वाढत आहे. गरीब शेतकऱ्यांकडे स्वतःचे भांडवल नसल्याने त्यांना कंपनीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, कंपन्यांकडून शेतकऱ्याला किरकोळ मोबदला देत आहे. त्यातून शेतकऱ्यांना वीज बिल, कामगारांचा खर्च, बँकेचे कर्ज, पोल्ट्री व्यवस्थापनाचा खर्च कसा भागवायचा? यासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी एकवटले आहेत.

...तर आंदोलन करणार

ठाणे-पालघर-रायगड पोल्ट्री योद्धा या सहकारी संस्थेच्या नेतृत्वाखाली पोल्ट्रीधारक संघटित झाले आहेत. कंपन्यांनी चालवलेली लूट व फसवणूक आता यापुढे सहन केली जाणार नाही, असा निर्धार पोल्ट्रीधारकांनी केला. या मेळाव्यात रायगड पोल्ट्री योद्धा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर, संचालक विलास वळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. यापुढे शासनाने पोल्ट्रीधारकांच्या मागण्या मान्य न केल्यास रायगड, ठाणे, पालघर तिन्ही जिल्ह्यांत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा खामकर यांनी दिला आहे.

-----------

Web Title: Poultry traders from Thane, Palghar gathered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.