शहापुरात १३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:05+5:302021-06-16T04:53:05+5:30
तालुक्यात घरगुती, औद्याेगिक, व्यावसायिक, पाणी पंप, दिवाबत्ती, शेतीपंप व इतर असे एकूण ८० हजार ग्राहक आहेत. त्यापैकी घरगुती स्वरूपाच्या ...
तालुक्यात घरगुती, औद्याेगिक, व्यावसायिक, पाणी पंप, दिवाबत्ती, शेतीपंप व इतर असे एकूण ८० हजार ग्राहक आहेत. त्यापैकी घरगुती स्वरूपाच्या २७ हजार १५१ ग्राहकांकडून ९ कोटी ९१ हजार, व्यावसायिक स्वरूपाच्या तीन हजार ६७२ ग्राहकांकडून तीन कोटी, १४ लाख ४३९, औद्योगिक ग्राहकांकडून तीन कोटी व इतर पाच हजार ७३८ ग्राहकांकडून दाेन कोटी अशा एकूण ३७ हजार थकबाकीदारांकडून १९ काेटी रुपयांची थकबाकी येणे आहे. लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना वितरण कंपनीने दिलेल्या शॉकमुळे त्यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. पाच-सहा महिन्यांपूर्वी थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात आली होती. परंतु तिला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. राज्याच्या ऊर्जा खात्याने दिलेल्या आदेशानुसार साेमवारपासून विद्युत वितरण कंपनीने थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. कोविडच्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे काम केले आहे. आता ग्राहकांनी कारवाई टाळण्यासाठी विजेची थकबाकी तत्काळ भरून सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता अविनाश कटकवार यांनी केले.