कल्याण-डोंबिवली दरम्यानचा पॉवरब्लॉक वेळेआधीच संपला; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 01:36 PM2019-12-25T13:36:29+5:302019-12-25T13:50:30+5:30
दुपारी 12.55 मिनिटांनी गर्डर टाकण्याचे काम संपले असून लवकरच लोकल सोडण्यात येणार आहेत.
डोंबिवली : ठाकुर्ली स्थानकामध्ये गर्डर टाकण्याच्या कामासाठी घेतलेल्या 4 तासंच्या पॉवरब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दर १५ मिनिटांनी डोंबिवलीहून सीएसटीकडे लोकल सोडण्यात येणार होती. मात्र, हे नियोजन फसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा वापर करावा लागला. या प्रवाशांची मोठी लूट रिक्षा, टॅक्सीवाल्याकडून करण्यात आली.
दुपारी 12.55 मिनिटांनी गर्डर टाकण्याचे काम संपले असून लवकरच लोकल सोडण्यात येणार आहेत. सर्वाधिक गर्दीच्या स्थानकातील रेल्वे प्रवाशांचे हाल झाले असून या स्थानकातून दर 15 मिनिटांनी लोकल सोडण्याचा रेल्वेचा प्रयत्न होता, परंतु तो सपशेल फेल ठरला. तासाभराने एखादी लोकल आल्याने स्थानकात तोबा गर्दी झाली होती. लोहमार्ग पोलिसांनीही रेल्वे अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. तेव्हा विनंतीवरून दोन रिकामे रेकन पाठवण्यात आल्याने गर्दीवर दोन तासांनी नियंत्रण मिळवण्यात आले.
Done !#Megablock planned @Central_Railway for launching of girders at Thakurli cancelled in time. Slow , Fast line Services are being normalised. pic.twitter.com/Sgu5nzcK1R
— Shivaji Sutar (@ShivajiIRTS) December 25, 2019
खारघरवरून आलेल्या महिलेकडून कल्याण-उल्हासनगर जाण्यासाठी 400 रुपये भाडे आकारण्यात आले. एरव्ही ही वाहतूक सुमारे 50 रुपयांत शेअर, टप्पा पद्धतीने होते. आज ब्लॉकमुळे रिक्षा चालकांनी लूट सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ठाकुर्ली पादचारी पुलाचे गर्डर काम करण्याआधी त्याची विधिवत पूजन रेल्वे अधिकाऱ्यांनी केली होती.