सुवर्णकन्या करते चिखलात सराव

By admin | Published: October 21, 2016 01:04 AM2016-10-21T01:04:09+5:302016-10-21T01:04:09+5:30

चिखलमाती, दगडगोटे, दारूड्यांनी फोडलेल्या बाटल्यांच्या काचा अशा मैदानात सराव करून इंटरस्कूल ते राष्ट्रीयस्तरावरील गोळाफेक स्पर्धेत आपला आगळावेगळा

Practice in gold mines | सुवर्णकन्या करते चिखलात सराव

सुवर्णकन्या करते चिखलात सराव

Next

ठाणे : चिखलमाती, दगडगोटे, दारूड्यांनी फोडलेल्या बाटल्यांच्या काचा अशा मैदानात सराव करून इंटरस्कूल ते राष्ट्रीयस्तरावरील गोळाफेक स्पर्धेत आपला आगळावेगळा ठसा उमटवून अवघ्या १४ वर्षीय अग्रता मेलकुंडे हिने ४१ पदके पटकावली असून यामध्ये ३६ सुवर्णपदकांचा समावेशे आहे. नुकताच नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णकन्या ठरलेल्या अग्रताने आता आपले मिशन थेट आॅलिम्पिक ठेवले आहे. एकीकडे वडिलांचे छप्पर हरपल्यानंतर अग्रतान आईच्या हिमतीवरच खेळाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
पारसिकनगर परिसरात राहणारी अग्रता ही सेंट जॉन हायस्कूलची विद्यार्थिनी असून ती इयत्ता नववीत शिकते. मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणारे तिचे वडील महेश यांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. त्यामुळे अग्रताच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी तिची आई प्राची यांच्या खांद्यावर पडली. अग्रता हिचा लहानपणापासूनच खेळाकडे कल असल्याने आईने तिला सर्व मदत केली. शालेय ते राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करून आतापर्यंत तिने तब्बल ४१ पदके पटकावली आहेत. ही पदके पटकावताना तिने गोळाफेक खेळात अनेक रेकॉर्ड नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तिच्या नावावर आतापर्यंत ८ रेकॉर्डची नोंद आहे.

दादोजीमध्ये सराव करायला मिळेल का
ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडिअम असतानाही अग्रता कळव्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मैदानावर सराव करते. या मैदानाची परिस्थिती दगडगोटे, पाण्याचे डबके आणि दारूड्यांनी फोडलेल्या बाटल्यांच्या काचा अशीच आहे. या अडचणीतही तिने सराव सुरूच ठेवला आहे. मात्र, पदकांची संख्या वाढतानाही दादोजीमध्ये तिला सराव करण्यासाठी जागा मिळत नसल्याची खंत तिची आई प्राची यांनी व्यक्त केली.

सध्या मी १४ वर्षीय वयोगटात खेळते, पण लवकरच १७ वर्षीय वयोगटात खेळणार आहे. तसेच आगामी लक्ष्य हे मिशन आॅलिम्पिक आहे. माझे प्रशिक्षक हे माझे देव असून त्यांच्यामुळेच मी आतापर्यंतचे यश मिळवू शकले. त्याचबरोबर आईच्या हिमतीवरच मी ही झेप घेईल.
- अग्रता मेलकुंडे

अग्रताची इच्छाशक्ती आणि तिची मेहनत पाहूनच तिला मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. जिद्द असेल तर कोणत्याही खेळाडूला कोणत्याही महागड्या साधनांची गरज भासत नाही. तसेच परिस्थितीवर मात करू न असे खेळाडू पुढे जातात, हे तिने वारंवार आपल्या दाखवून दिले.
- तरविंदर सिंह, प्रशिक्षक

Web Title: Practice in gold mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.