कष्टकऱ्यांसाठी आयुष्यमान भारत, प्रकाश जावडेकरांनी केला शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 03:08 AM2018-09-25T03:08:44+5:302018-09-25T03:08:47+5:30
ठाणे जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागद वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजीविक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला.
ठाणे - जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागद वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजीविक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १० कुटुंबांना हेल्थकार्डचे वाटपही यावेळी केले. जिल्ह्यातील तीन लाख ५० हजार कुटुंबीयांना या आरोग्य योजनेचा लाभ होईल.
याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार किसन कथोरे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमात अलका धोंगडे, शंकर घोडे, जयेश गोडे, सुमन इतरकर, रूपाली धोंगडे, मानसी भगत, चंद्रकांत साबळे, लक्ष्मी घोडे, सखुबाई आदी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्थकार्ड देण्यात आले.
सरकारी कर्मचाºयांना वैद्यकीय सुविधांसाठी संरक्षण असते. आरोग्य विमा प्रीमिअम हप्ते भरणाºया लोकांनाही ते मिळते, पण गरीब आणि दुर्बल घटकांना वैद्यकीय मदतीची गरज भासली, तर पैशांअभावी त्यांना उपचार मिळू शकत नाहीत. पण, आयुष्यमान भारत योजनेमुळे संपूर्ण देश निरोगी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. देशभरातील सरकारी रु ग्णालये या योजनेत सहभागी आहेत. तशीच लवकरच बहुसंख्य खासगी रु ग्णालयेदेखील यात समाविष्ट करण्यात येतील, असे जावडेकर यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
कथोरे व कपिल पाटील यांनीदेखील या योजनेमुळे वैद्यकीय लाभ मोठ्या प्रमाणावर गरिबांना मिळून या क्षेत्रात क्र ांती होईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले की, कोणत्याही शहराचा हॅप्पी इंडेक्स हा केवळ शहरातील इमारती, सुविधा यावर मोजता येत नाही, तर तेथील नागरिकांचे आरोग्य कसे आहे, यावरही अवलंबून आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.