प्रल्हाद म्हात्रे यांनी घेतले ७४ विद्यार्थ्यांना दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:22+5:302021-07-26T04:36:22+5:30
डोंबिवली : काेराेनामुळे बेराेजगारी ओढवलेल्या पालकांना शालेय फी भरणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ज्येष्ठ उद्याेजक ...
डोंबिवली : काेराेनामुळे बेराेजगारी ओढवलेल्या पालकांना शालेय फी भरणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ज्येष्ठ उद्याेजक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डाेंबिवली शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल चाइल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्यामंदिर या शाळेतील पाचवी ते दहावी इयत्तेतील २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ७४ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचे शालेय शुल्क भरण्यासाठी एक लाख १२ हजारांचा धनादेश मुख्याध्यापक अंकुर आहेर व शिक्षकांच्या हाती सुपूर्द केला. रेल चाइल्ड प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक संजय चौधरी, महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक अंकुर आहेर, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत देठे आणि पालक सुनील भोसले यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर म्हात्रे यांनी त्याला त्वरित प्रतिसाद दिला.