ठाणे जिल्ह्यात नऊ ठिकाणी 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' सुरू
By सुरेश लोखंडे | Published: October 19, 2023 07:47 PM2023-10-19T19:47:38+5:302023-10-19T19:47:53+5:30
राज्यभरातील ५११ "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे" ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार करण्यात आले.
ठाणे: राज्यभरातील ५११ "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे" ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार करण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नऊ केंद्रांचा समावेश आहे. यास अनुसरून जिल्ह्यात ठिकठिकाणी या कार्यक्रमाचे थेट आँनलाईन प्रक्षेपणाद्वारे पंतप्रधानाचे या विषयीचे विचार ऐकता आले.
जिल्ह्यातील या न ऊ कौशल्य विकास केंद्रापैकी भिवंडी तालुक्यात कोन ग्रामपंचायत येथील आटगाव शिक्षण मंदिर, येथे या कार्यक्रमाचा गांवकर्यांनी आँनलाईन पार पडला. यावेळी पंचायतराज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, यांच्या सह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,जिल्हा परिषद सीईओ मनुज जिंदल आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रमाणेच अंबाडी ग्रामपंचायत येथील हायस्कूल हा कार्यक्रम पार पडला.
कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामपंचायतीमधील- जीवनदीप कॉलेज, कांबा येथील रॉयल गार्डन. मुरबाड तालुका सरळगाव - कावेरी मंगल कार्यालय, म्हसा येथील खांबलिंगेश्वर मंदिर येथे कार्यक्रम पार पडला. शहापूर तालुक्यातील मोखावणे आणि वाशिंद येथील न्यू आयडियल स्कूलमध्ये कार्यक्रम झाला. याप्रमाणेच अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथे कार्यक्रमाचा लाभ घेण्यात आला.