ठाण्यात निरव मोदीच्या प्रतिमेला जोड्यांचा प्रसाद, ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:04 PM2018-02-17T15:04:02+5:302018-02-17T15:05:54+5:30
निरव मोदी याच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी याच्या प्रतीमेला जोड्यांचा प्रसाद संतप्त कार्यकर्त्यांनी दिला.
ठाणे - सुमारे १३ हजार कोटी रूपये लुटून परागंदा झालेल्या निरव मोदी याच्या कारनाम्याला पंजाब नॅशनल बँकही जबाबदार आहे, असा आरोप करीत, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान, डावोसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत निरव मोदी छायाचित्रकाढून घेतो; पंतप्रधान मोदी यांच्या नाकाखाली हे भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे मन की बात करणाºया पंतप्रधानांनी आता जनिहत की बात करावी, असा टोला परांजपे यांनी लगावला.
पीएनबीमध्ये सुमारे १२ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. एवढी रक्कम पीएनबीने निरव मोदी याला मंजूरच कशी केली. असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पीएनबीच्या नौपाडा शाखेसमोर जोरदार निदर्शने केली. बडा मोदीने हात दिया... छोटा मोदी भाग गया; ललित, मल्ल्या, मोदी ... सब भ्रष्टाचार के साथी; गरीबांचा पैसा लुटतो कोण... मोदीशिवाय आहेच कोण आदी घोषणा देत राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदीच्या प्रतिमेला चप्पलांनी बडवण्यात आले. या आंदोलनात पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून सुमारे ११,४०० कोटी रु पयांचा घोटाळा करून सर्व सामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारणाºया निरव मोदी व पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाºयांचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आनंद परांजपे यांनी सांगितले की, एवढा मोठा घोटाळा होत असताना पीएनबीचे व्यवस्थापन शांत का बसले होते? याचा विचार केला पाहिजे. गोरगरिबांनी आपल्या घामाचा पैसा बँकेत ठेवला होता. आता ही बँक दिवाळखोरीत जाणार आहे. या गोरगरिबांना त्यांचा पैसा कोण देणार, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. या घोटाळ्याला जसे पीएनबी व्यवस्थापन जबाबदार आहे; तसेच सरकारही आहे. बिगर शासकीय बँकांवर सरकारचे नियंत्रण नसल्याचे या घोटाळ्यामुळे सिद्ध झाले आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत करायची भाषा करायची आणि निरवला बाजूला बसवायचे, असा प्रकार पंतप्रधान करीत आहेत. त्यामुळे त्यांनी आता जबाब दिलाच पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
- शुक्र वारी रात्री उशिरा ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्य कार्यकर्त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्डाला काळे फासले. ठाण्यातील गोखले रोडवर मल्हार सिनेमागृहाजवळ पंजाब नॅशनल बँकेची शाखा आहे.