पालकमंत्र्यांपेक्षा प्रताप सरनाईकच खरे किंगमेकर, राष्ट्रवादीच्या मतांत बिघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:03 AM2019-05-29T00:03:25+5:302019-05-29T00:03:39+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचाच वरचष्मा दिसून आला आहे.

Pratap Sarnai's true Kingmaker, NCP's candidate, Mantang Bighadi | पालकमंत्र्यांपेक्षा प्रताप सरनाईकच खरे किंगमेकर, राष्ट्रवादीच्या मतांत बिघाडी

पालकमंत्र्यांपेक्षा प्रताप सरनाईकच खरे किंगमेकर, राष्ट्रवादीच्या मतांत बिघाडी

Next

- अजित मांडके
ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचाच वरचष्मा दिसून आला आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांचीच पकड असल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना तब्बल एक लाख ४० हजार ७११ मते मिळाली आहेत. ते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यापेक्षा तब्बल १८ हजार ३९५ ने जास्त आहेत.
मागील निवडणुकीत याच मतदारसंघातून विचारे यांना ९९ हजार सात मते मिळाली होती. मागील वेळेच्या तुलनेत यंदा त्यांच्या मतांमध्ये ४१ हजार ७०४ मतांची निर्णायक वाढ झाली असून ती विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी महत्त्वाची राहणार आहेत. येथून मतदारसंघातून राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांना ४७ हजार ९९३ मते मिळाली असून मागील वेळेस राष्टÑवादीला ४१ हजार १०७ मते मिळाली होती. त्यात यंदा केवळ सहा हजार ८८६ मतांची वाढ झाली आहे. परंतु, शिवसेनेच्या मतांमध्ये राष्टÑवादीच्या वाढीव मतांच्या तुलनेत सातपट अधिक वाढ झाल्याने त्यांना विधानसभेचे गणित आणखी सोपे होणार आहे.
या विधानसभा मतदारसंघात युतीच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वाधिक असून राष्टÑवादीचा येथे भोपळा असून काँग्रेसचे मीरा-भार्इंदर महापालिकेत १२ नगरसेवक आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या दोनही उमेदवारांना मिळून अवघी ३४ हजार २१५ मते मिळाली होती. त्या तुलनेत आता लोकसभा निवडणुकीत वाढ झाली, हीच काय ती राष्टÑवादीसाठी जमेची बाजू आहे. दुसरीकडे शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना ६८ हजार ५७१ मते मिळाली होती, तर भाजप वेगळी लढली असल्याने भाजपचे संजय पांडे यांना ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. आता या मतांची बेरीज केली, तर ती एक लाख २६ हजार २३६ एवढी होते. परंतु, लोकसभा निवडणुकीत हे दोनही पक्ष एकत्र लढल्याने त्याचा निश्चितच फायदा विचारे यांना झाला असून त्यांच्या मतांमध्ये निर्णायक वाढ झाली आहे. त्यात मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय पांडे हेच आता शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे सरनाईक यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. दुसरीकडे मनसेने मागील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून २० हजारांच्या आसपास मते घेतली होती. परंतु, लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेची काही मते राष्टÑवादीच्या पारड्यात पडल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्याचा जास्तीचा फायदा परांजपे यांना होऊ शकलेला नाही. त्यात, आता विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी आणि काँग्रेस एकत्र लढले तरीसुद्धा शिवसेना आणि भाजपच्या मतांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आताच शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघातून राष्टÑवादीपेक्षा सातपट अधिक वाढीव मते पडल्याने हे मताधिक्य तोडण्याचे मोठे आव्हान राष्टÑवादीपुढे असणार आहे. शिवाय, या पट्ट्यात राष्टÑवादीला मानलेला गट असला तरी काँग्रेसची फारशी मदत या पट्ट्यात राष्टÑवादीला होईल, असे चित्र सध्या लागलेल्या निकालातून दिसत आहे.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा इतर ठिकाणी महत्त्वाचा फॅक्टर ठरला असला, तरी ठाणे लोकसभा मतदारसंघात हा फॅक्टर फारसा चालला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही तो चालेल, असेही दिसत नाही.
>की फॅक्टर काय ठरला?
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची मजबूत पकड असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. या मतदारसंघातून इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात जास्तीची आघाडी त्यांनी मिळवून दिली आहे. या पट्ट्यात ठाण्यातील काही भाग येतो, तर काही भाग मीरा-भाईंदरचा येतो. परंतु, या दोन्ही भागांतून शिवसेनेला निर्णायक मतांची आघाडी मिळवण्यात यश आले. या मतदारसंघातून राष्टÑवादीने काँग्रेस आघाडीच्या मतांमध्ये वाढ झाली असले, तरी जेवढी अपेक्षा होती, तेवढी ती पूर्ण होऊ शकलेली नाही. सेनेच्या मतांमध्ये ४१ हजारांहून अधिक मतांची वाढ झाल्याचे दिसून आले.
>विधानसभेवर काय परिणाम?
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संजय पांडे यांनी सरनाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांनीच आता शिवसेनेत प्रवेश केला असल्याने ही शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरणार आहे. त्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत येथे शिवसेनेच्या मतांमध्ये निर्णायक अशी वाढ झाली असल्याने ही शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरणार आहे. परंतु, राष्टÑवादी आणि काँग्रेस हे आघाडीत लढले, तरी त्यांना शिवसेनेच्या सातपट अधिक मते मिळवावी लागणार आहेत.

Web Title: Pratap Sarnai's true Kingmaker, NCP's candidate, Mantang Bighadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.