प्रवीण पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:00 AM2019-06-12T00:00:42+5:302019-06-12T00:01:11+5:30

भार्इंदर महापालिका : संध्या पाटील यांचा नकार, धनेश पाटील यांना पुन्हा आश्वासन

Pravin Patil's Leader of Opposition in bhayandar mahapalika | प्रवीण पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद

प्रवीण पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद

Next

मीरा रोड : शिवसेना नगरसेविका संध्या प्रफुल्ल पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद घेण्यास नकार दिल्याने सेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या मर्जीतील माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकली आहे. आश्वासन देऊनही धनेश पाटील यांच्या हाती पुन्हा आश्वासनाचा खुळखुळा देण्यात आला.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपने शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी चांगलेच छळले. काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तसेच शासन व न्यायालयातून कारवाईचा बडगा येईल, या धास्तीने अखेर भाजपने सेनेला विरोधी पक्षनेतेपद दिले. सेनेच्या राजू भोईर यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. पुढील वर्षासाठीचे विरोधी पक्षनेतेपद देण्याचे आश्वासन स्थानिक सेना नेतृत्वाने नगरसेवक धनेश परशुराम पाटील यांना दिले होते. परंतु, विरोधी पक्षनेता बदलण्यासाठी जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा आमदार प्रताप सरनाईक यांनी संध्या पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद घेण्याचा आग्रह धरला. परंतु, संध्या यांनी आपणास उपमहापौरपद हवे असल्याचे सांगून विरोधी पक्षनेतेपद घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. संध्या यांनी नकार दिला असताना आपणास दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सदरचे पद द्यावे, असा आग्रह धनेश यांनी धरला होता. परंतु, यंदादेखील धनेश यांच्या हाती आश्वासनाचा खुळखुळा देऊन माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांच्या गळ्यात सदर पदाची माळ सेना नेतृत्वाकडून घालण्यात आली आहे.

दरम्यान, प्रवीण यांना मागील वेळीदेखील उपमहापौरपद दिले होते. परंतु, शहरात शिवसेनेच्या बांधणीसाठी तसेच संघटना शहरवासीयांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचे काम मात्र केले नाही. स्थायी समिती सभापतीपद मिळालेले व सध्या गटनेते असलेले हरिश्चंद्र आमगावकर यांच्याकडूनही शिवसेनेच्या खाक्याप्रमाणे काम झाले नसल्याची खंत शिवसैनिक बोलून दाखवतात.

प्रताप सरनाईक यांच्या मर्जीतील पाटील
च्माजी महापौर कॅटलीन परेरा, नीलम ढवण, शर्मिला बगाजी, धनेश पाटील, दिनेश नलावडे, दीप्ती भट, स्रेहा पांडे आदींपैकी कोणाला तरी विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळेल, अशी आशा होती. परंतु, आ. सरनाईक यांच्या मर्जीतील प्रवीण यांच्या गळ्यातच पदाची माळ टाकली.

च्पद मिळाल्यानंतर यंदा तरी शहरात संघटना बळकटीकरणासाठी प्रवीण ठोस कार्य करतील, अशी गरजदेखील शिवसैनिकांनी बोलून दाखवली. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आल्याने पक्षाला शहरात मोठे कार्य करण्याची गरज आहे.

Web Title: Pravin Patil's Leader of Opposition in bhayandar mahapalika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.