लसीकरणासाठी आता स्थानिकांना प्राधान्य; मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 11:30 PM2021-04-30T23:30:17+5:302021-04-30T23:30:24+5:30

मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांचे निर्देश : वसई, विरारमधील नागरिकांचे प्रमाण होते अधिक

Preference is now given to locals for vaccination | लसीकरणासाठी आता स्थानिकांना प्राधान्य; मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांचे निर्देश

लसीकरणासाठी आता स्थानिकांना प्राधान्य; मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांचे निर्देश

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदर मनपाच्या लसीकरण केंद्रात वसई-विरारमधील नागरिक येऊन लस घेऊन जात असल्याचे वृत्त २३ एप्रिलच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने केले जाणार असे आश्वस्त केले होते. त्याआनुषंगाने आता लसीकरण केंद्रावर आता आधारकार्डवरील पत्ता तपासून शहरातील स्थानिक नागरिकांना लस देण्यात प्राधान्य दिले जात आहे.

शासनाकडून मीरा-भाईंदरला मिळणारा लसीचा कोटा हा अतिशय कमी आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर रोज ४०० ते ५०० लोकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु, शहरातील लसीकरण केंद्रांवर वसई तालुक्यातील लोक लाभ घेत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने  उघडकीस आणला होता.

लसीकरणासाठी येणाऱ्यांची नोंदणी होताना त्याच्या आधार ओळखपत्रावरून तो कुठला रहिवासी आहे हे कळते. परंतु, केंद्रावरील नोंदवहीत मात्र केवळ लस घेणाऱ्यांचे नाव व मोबाइल क्रमांक घेतला जातो. तो रहिवासी कुठला आहे याची नोंद घेतली जात नाही. जेणे करून वसई तालुक्यातून १० ते २० टक्के लोक लस घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले जात होते. ऑनलाइन व ऑफलाइन प्रकरणांत वसईचे नागरिक  लसीकरणास येत असल्याने मीरा-भाईंदरमधील नागरिकांना मात्र लसीकरणासाठी विलंब लागत होता.
 

Web Title: Preference is now given to locals for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.