उपचार करणाऱ्यांच्या लसीकरणास प्राधान्य दिल्याने तिसरी लाट रोखण्यास होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:44+5:302021-07-21T04:26:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र महापालिका हद्दीत ...

Preferring vaccinations for therapists will help prevent the third wave | उपचार करणाऱ्यांच्या लसीकरणास प्राधान्य दिल्याने तिसरी लाट रोखण्यास होणार मदत

उपचार करणाऱ्यांच्या लसीकरणास प्राधान्य दिल्याने तिसरी लाट रोखण्यास होणार मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र महापालिका हद्दीत दुसऱ्या लाटेच्या आधीच जानेवारी महिन्यापासून लसीकरणास सुरुवात झाली. लसीकरणास सुरुवात झाली तेव्हाच हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यासाठी प्राधान्य दिले आहे. आता तिसरी लाट येऊ घातली आहे. त्याआधीच हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस दिल्याने तिसरी लाटेशी सामना करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

महापालिकेस लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. तरीदेखील महापालिका लसीकरण अधूनमधून स्थगित ठेवून उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे. महापालिकेने हेल्थ वर्कर्सना लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस देताना डोळ्य़ांसमोर ठेवलेले लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला डोस हेल्थ केअर वर्कर्सना ११६ टक्के, तर दुसरा डोस ३८ टक्के दिला आहे. फ्रंटलाईन वर्कर्सना १५४ टक्के पहिला डोस, तर दुसरा डोस ३५ टक्के दिला आहे.

-----------------

हेल्थ वर्कर्स

पहिला डोस - १८४००

दुसरा डोस - ७०२०

एकूण - २५४२०

-------------------

फ्रंटलाईन वर्कर्स

पहिला डोस - १७४७१

दुसरा डोस - ६२७८

एकूण - २३७४९

---------------------

१८ ते ४४ वयोगट

पहिला डोस - ५१७८७

दुसरा डोस - ५३३१

--------------------

४५ ते ६० वयोगट

पहिला डोस - ११७१६३

दुसरा डोस - ३६६७६

--------------------

६० पेक्षा अधिक वयोगट

पहिला डोस - ७६७९०

दुसरा डोस - ३६९१४

--------------------

एकूण लसीकरणाचे लक्ष्य - १३५९७१५

आतापर्यंत किती जणांना दिली लस - ४४०५५१

खाजगी रुण्णालयातील लसीकरण - ४९३३४

कामाच्या ठिकाणचे लसीकरण - १७३८२

-----------------

लसीकरणाविषयी उदासीनता नाही...

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत लसीकरणाविषयी उदासीनता नाही. मात्र महापालिका हद्दीत पुरेशी लस उपलब्ध होत नाही.

झोपडपट्टी आणि चाळ परिसरांतील लसीकरण वाढविण्यासाठी फिरते लसीकरण केंद्र सुरू

चार बसेसमधून सुरू आहे फिरते लसीकरण

पुरेशी लस उपलब्ध झाल्यास घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे नियोजन

-----------------

कोट-

जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्या दृष्टीने जसे लसीचे डोस महापालिकेस उपलब्ध होत आहेत, त्याप्रमाणे लसीकरण सुरू आहे. जास्तीत जास्त लसीचे डोस मिळाल्यास लसीकरणाचे लक्ष्य गाठता येऊ शकते. प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करता येऊ शकते.

- डॉ. संदीप निंबाळकर, वैद्यकीय अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका, आरोग्य विभाग

------------------

Web Title: Preferring vaccinations for therapists will help prevent the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.