डॉक्टर नसल्याने गर्भवतीची फरफट

By admin | Published: June 19, 2017 03:47 AM2017-06-19T03:47:16+5:302017-06-19T03:47:16+5:30

आदिवासींच्या आरोग्य सेवेसाठी शासनाने सुमारे २ कोटी खर्चून उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नाही. तसेच या

Pregnancy due to lack of doctor | डॉक्टर नसल्याने गर्भवतीची फरफट

डॉक्टर नसल्याने गर्भवतीची फरफट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : आदिवासींच्या आरोग्य सेवेसाठी शासनाने सुमारे २ कोटी खर्चून उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नाही. तसेच या आरोग्य केंद्राला टाळे असल्याने ही महिला आरोग्य केंद्राच्या आवाराबाहेरच प्रसूत झाल्याची संतापजनक घटना शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथे रविवारी दुपारी घडली.
संपूर्ण आदिवासी भाग असलेल्या खरपत (सावरोली) येथील अलका महेश मेंगाळ (२८) या महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिचा पती महेश मेंगाळ आणि नातेवाईकांनी तिला जवळच्या टाकीपठार प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी तथा वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर उपलब्ध नव्हते. एवढेच नव्हे तर या रुग्णालयाला चक्क टाळे होते. दरम्यानच्या काळात अलकाला जास्तच त्रास होऊ लागल्याने पतीने तिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात बसविले आणि तो डॉक्टर, नर्स यांचा शोध घेण्यासाठी धावाधाव करू लागला. एकीकडे प्रचंड वेदनेने त्रस्त झालेल्या या महिलेच्या मदतीस आसपासच्या महिलांनी धाव घेतली. दोन तासांच्या या धावपळीत एकही आरोग्य कर्मचारी तथा डॉक्टर उपलब्ध न झाल्याने अखेर ही महिला रुग्णालयाच्या आवारातच प्रसूत झाली. अखेर टाकीपठार येथे डॉक्टर नसल्याने उपचारासाठी महेश मेंगाळ याने आपल्या पत्नीला किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु तेथेही तिच स्थिती. अखेर दुपारी ३ च्या सुमारास सदर महिलेस शेणवा येथील आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील उपचार सुरू केले.

Web Title: Pregnancy due to lack of doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.