गर्भवती पत्नी एकटी वॉकला गेली, पतीने फोन करून दिला तिहेरी तलाक; मुंब्रा परिसरातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:43 IST2024-12-18T10:40:59+5:302024-12-18T10:43:03+5:30

ठाण्यातील मुंब्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Pregnant wife went for a walk alone, husband called her and gave her triple talaq; Shocking incident in Mumbra area | गर्भवती पत्नी एकटी वॉकला गेली, पतीने फोन करून दिला तिहेरी तलाक; मुंब्रा परिसरातील धक्कादायक प्रकार

गर्भवती पत्नी एकटी वॉकला गेली, पतीने फोन करून दिला तिहेरी तलाक; मुंब्रा परिसरातील धक्कादायक प्रकार

ठाण्यातील मुंब्रा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीआहे. एक पत्नी सकाळी एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्याने संतप्त पतीने पत्नीच्या वडिलांना फोन करून पत्नी एकटी वॉकला गेल्यामुळे तिला तिहेरी तलाक देत असल्याचं सांगितले. या प्रकरणी पत्नीने पती विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम ४ प्रमाणे तिहेरी तलाकच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करुन पतीला नोटीस पाठवली आहे,  पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जानेवारी २०२४ रोजी कुर्ल्याच्या अलिखान यांच्याशी महिलेचा विवाह झाला होता. ही महिला गर्भवती असल्यामुळे ती कुर्ल्यातून आपल्या आईवडिलांच्या घरी मुंब्रा येथे राहत होती. १० डिसेंबर २०२४ रोजी अलिखानने आपल्या पत्नीला फोन केला असता ती मॉर्निंग वॉकसाठी गेल्याचे समजले. यावर पतीने तिला परत कुर्ल्यात येण्यास सांगितले. मात्र, परिस्थितीमुळे ती येऊ शकत नसल्याचे सांगताच पतीने फोन ठेवला.

२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट

महिला घरी पोहोचल्यावर अलिखानने पुन्हा फोन करून स्पीकर ऑन करण्यास सांगितले आणि कुटुंबासमोर तीनदा तलाक दिला. या घटनेनंतर महिलेला आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी ११ डिसेंबर २०२४ रोजी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.मुंब्रा पोलिसांनी पती अलिखानविरोधात ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा नोंदवून पतीला नोटीस पाठवली आहे. तसेच मॉर्निंग वॉकच्या कारणामुळे तलाक दिला की यामागे काही वेगळे कारण आहे, हे तपासले जात आहे. तपास अधिकारी रविंद्र पाखरे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Pregnant wife went for a walk alone, husband called her and gave her triple talaq; Shocking incident in Mumbra area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.