अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या रोड मॅपसाठी जिल्हाधिकार्यांकडून पूर्व तयारी आढावा

By सुरेश लोखंडे | Published: September 3, 2024 10:22 PM2024-09-03T22:22:04+5:302024-09-03T22:22:30+5:30

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक आज पार पडली.

preparatory review by collector for road map to make economy one trillion dollar  | अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या रोड मॅपसाठी जिल्हाधिकार्यांकडून पूर्व तयारी आढावा

अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या रोड मॅपसाठी जिल्हाधिकार्यांकडून पूर्व तयारी आढावा

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सन २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठी रोड मँप तयार करण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सर्वांसाठी घरे, आर्टिफिशीयल इंटेलिजेन्स आणि हायटेक आयटी पार्क, पर्यावरण पूरक विकास,  इंडस्ट्रिज ४.० च्या अनुषंगाने सेमी कंडक्टर आणि सोलर सेल मॅन्युफॅक्चरिंग, वाढवण बंदर विकास आदींचा समावेश आहे. यासाठी १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत ठाणे जिल्ह्यात कार्यशाळा आयोजित होणार आहे. याच्या पूर्व तयारीसाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक आज पार पडली.
          
पर्यावरण पूरक विकास म्हणजे ग्रीन हायड्रोजन, सांडपाणी व्यवस्थापन, सौरउर्जा, सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा अधिकाधिक विकास धोरण ठरवण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास धोरण विकास २०३० साठी या कारयशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.  या कार्यक्रमाची पूर्व तयारी आढावा बैठक आज येथील समिती सभागृहात आज पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) संस्थेचे उपाध्यक्ष सुशिल खोडवेकर, ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रोडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाचा महानगर क्षेत्रातील विकास धोरणाच्या जडणघडणीत महत्त्वाचा हातभार लागणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: preparatory review by collector for road map to make economy one trillion dollar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे