ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढणारा आराखडा तयार करा- शंभुराज देसाई

By सुरेश लोखंडे | Published: May 9, 2023 04:15 PM2023-05-09T16:15:33+5:302023-05-09T16:20:02+5:30

सोनचाफा, हळदीचे क्षेत्र वाढवा

Prepare a plan to increase the average income of farmers in Thane district, said that Minister Shambhuraj Desai | ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढणारा आराखडा तयार करा- शंभुराज देसाई

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढणारा आराखडा तयार करा- शंभुराज देसाई

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात भात, वरी पिकांबरोबरच सोनचाफा, हळदी, भेंडी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करा. शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढावे, यासाठी आराखडा तयार करावा. भाजीपाला व बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी महापालिका क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्तांना सूचना देऊ, असे स्पष्ट करीत खरीप हंगामात खते, बियाणे, पिककर्ज पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज येथे दिले.

येथील िनयाेजन भवनमध्ये जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी उपस्थित कृषी अधिकारी, सदन शेतकरी आदींना सखाेल मार्गदर्श् न देसाई यांनी यावेळी दिले. दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थ्ति राहून ते बाेलत हाेते. आमदार किसन कथोरे यांनीही दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून आढावा बैठकीत मार्गदर्शन केले. आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, कृषी अधिकारी सारिका शेलार, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस उपस्थित होते.

जिल्हा कृषि विभागाने केलेल्या खरीप हंगामा २०२३ च्या नियोजनाचा आढावा घेऊन देसाई म्हणाले की, जिल्ह्यातील लागवडी योग्य क्षेत्र दुप्पटीने वाढविण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यात सोनचाफा फुलाचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश दिल्याचे सुताेवाचही त्यांनी यावेळी केले. कृषी क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा कृषि विभागाने आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषि पतपुरवठा मिळावा, याकडेही लक्ष देण्याचेही त्यांनी सांगितले.. एक रुपयात पिक विमा या योजनेपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी अवर्जुन सांगितले.

जिल्ह्यात आंबा पिकाऐवजी फणस, काजू, हळद या पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे कथाेरे यांनी सांगितले. आमदार मोरे यांनीही नागली, वरई व बांधावरील तूरच्या उत्पादनावर भर देण्याची सूचना केली. शिनगारे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील कृषि क्षेत्राची माहिती दिली. जिल्ह्यात भात व नागली या पिकांबरोबरच हळद, सोनचाफा फुलांच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. तसेच भात पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यावर कृषि विभाग भर देत असल्याचे िजल्हाधिकार्यांनी यावेळी लक्षात आणून दिले.

Web Title: Prepare a plan to increase the average income of farmers in Thane district, said that Minister Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.