अभिनय कट्ट्यावर विविध सामाजिक राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या स्वलिखित द्वीपात्री सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 04:09 PM2019-06-10T16:09:16+5:302019-06-10T16:11:22+5:30

अभिनय कट्टा अभिनय क्षेत्रात स्वतःच अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या नवोदित कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ.मायनगरीत चित्रपटसृष्टीत काम करण्याची स्वप्ने उरी बाळगून मेहनत करणाऱ्या कलाकारांसाठी मार्गदर्शक आणि उत्साह वाढवणारा हा कट्टा.

Presented by the holographic quote on various social issues related to acting | अभिनय कट्ट्यावर विविध सामाजिक राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या स्वलिखित द्वीपात्री सादर

अभिनय कट्ट्यावर विविध सामाजिक राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या स्वलिखित द्वीपात्री सादर

Next
ठळक मुद्देविविध सामाजिक राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या द्वीपात्री सादरद्विपात्री मधून *प्रथम क्रमांक 'बाप नंबरी बेटा दस नंबरीअभिनय करताना सहकलाकारासोबत जुळवून घेणे दोघांमधील टायमिंग ह्या महत्वाच्या बाबी : किरण नाकती

ठाणेअभिनय कट्ट्याचे संस्थापक सिंड्रेला चित्रपटाचे लेखक  दिग्दर्शक  किरण नाकती ह्यांच्या मार्गदशनाखाली प्रत्येक कलाकार येथे अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे.अभिनयातील प्रत्येक अंगावर इथल्या प्रत्येक कलाकारांवर मेहनत घेतली जाते.असाच द्वीपात्री अभिनयाची जुगलबंदी कट्टा क्रमांक ४३२ वर रंगली. सदर स्पर्धेत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी विविध सामाजिक राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या स्वलिखित द्वीपात्री सादर केल्या. 

      परेश दळवी आणि अभय पवार ह्यांनी 'हास्यकविसंमेलन', महेश झिरपे आणि दत्तराज सपकाळ ह्यांनी 'माझं ब्रेकअप', रोहिणी थोरात आणि साक्षी महाडिक ह्यांनी 'न्युज चॅनेलची गंमत', माधुरी कोळी आणि सई कदम ह्यांनी 'मी राणी लक्ष्मीबाई बोलतेय',आरती ताथवडकर आणि रुक्मिणी कदम ह्यांनी 'मराठी मालिकेचा प्रवास', शिल्पा लाडवंते आणि प्रतिभा घाडगे ह्यांनी 'माझ्या गावातला दुष्काळ',न्यूतन लंके आणि विद्या पवार ह्यांनी 'एक होता विसारभोळा राजा',वैभव चव्हाण आणि ओंकार मराठे ह्यांनी 'ढवळ्या-पवळ्या', आदित्य नाकती आणि राजन मयेकर ह्यांनी 'बाप नंबरी बेटा दस नंबरी'* ह्या द्विपात्रीचे सादरीकरण केले.

      सदर द्विपात्री मधून *प्रथम क्रमांक 'बाप नंबरी बेटा दस नंबरी',द्वितीय क्रमांक 'न्युज चॅनेलची गंमत',तृतीय क्रमांक मी 'राणी लक्ष्मीबाई बोलतेय' आणि उत्तेजणार्थ पारितोषिक 'हास्यकविसंमेलन'* ह्या द्विपात्रिना मिळाला.प्रत्येक जोडीने आवाहणाचे विडिओ बनवले होते.ते अभिनय कट्ट्याच्या फेसबुक पेज वरून प्रदर्शित करण्यात आले त्या व्हिडिओस ना मिळालेल्या व्युज वरून टीआरपी नंबर १  हे पारितोषिक 'माझ्या गावातला दुष्काळ',टीआरपी नंबर २ मी राणी लक्ष्मीबाई बोलतेय आणि टीआरपी नंबर ३ बाप नंबरी बेटा दस नंबरी ह्या द्विपात्री जोडयाना मिळाले. सदर कार्यक्रमात अभिनय बालसंस्कारशास्त्रील बालकलाकार *प्रथम नाईक आणि अद्वैत मापगावकर ह्यांनी माझी मुंबई-आपली मुंबई ,श्रेयस साळुंखे आणि अमोघ डाके ह्यांनी 'अकबर-बिरबल'* ह्या धम्माल द्विपात्री सादर केल्या.

           अभिनय करताना सहकलाकारासोबत जुळवून घेणे दोघांमधील टायमिंग ह्या महत्वाच्या बाबी असतात. त्या वृद्धिंगत व्हाव्यात.तसेच कलाकाराला सभोवतालच्या परिस्थितीविषयी सजक राहून भाष्य करता यावं.तसेच प्रकाशयोजना आणि संगीत ह्याचा योग्य अवलंब करता ह्याव म्हणूनच ह्या द्विपात्री स्पर्धेचं आयोजन केले होते.प्रत्येक जोडीने मिळून मेहनत घेऊन ही स्पर्धा रंगतदार बनवली हेच ह्या प्रयत्नाचे यश आहे. चुकांपासुन शिकून आपल्यातील कलाकाराला अजून प्रगल्भ करण्यासाठी सर्व कलाकारांना अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी शुभेच्छा दिल्या. सदर द्विपात्री स्पर्धेचे सूत्र संचालन अभिनय कट्ट्याच्या कलाकार कदिर शेख ह्याने केले.

Web Title: Presented by the holographic quote on various social issues related to acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.