सामाजिक बांधिलकीसाठी रंगांची उधळण, आत्तापर्यंत 27 लाखांची रंगरंगोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 02:34 PM2020-12-12T14:34:23+5:302020-12-12T14:38:24+5:30
बिना या उल्हासनगरातील ओटी सेक्शनमध्ये राहतात. त्याचे पती कुमार वाधवा व त्या यापूर्वी गेली २५ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होत्या. त्यांना रंग कामाची आवड असल्याने त्यांनी अमेरीकेत रंगकाम केले आहे.
कल्याण-कल्याण वालधूनी रेल्वे पूलाची रंगरंगोटी एका वयोवृद्ध महिलेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केली आहे. त्यामुळे पूलाचे रुपडे पालटले आहे. रंगरंगोटी करणा:या महिलेचे नाव बिना ओम बेनाम असे आहे. ती उल्हासनगरात राहते. तिने यापूर्वीही शाळा, स्मशानभूमी, अनाथालयांची रंगरंगोटी केलेली आहे.
बिना या उल्हासनगरातील ओटी सेक्शनमध्ये राहतात. त्याचे पती कुमार वाधवा व त्या यापूर्वी गेली २५ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होत्या. त्यांना रंग कामाची आवड असल्याने त्यांनी अमेरीकेत रंग काम केले आहे. त्यांना अमेरीकेत रंगकामाच्या मोबदल्यात ४०० डॉलर मिळत होते. त्यांना एक मुलगा आहे, हा मुलगा सध्या अमेरीकेतच वास्तव्याला आहे. बिना यांच्या एकाय पायाला डबल फॅक्चर झाले असल्याने त्या व त्यांचे पती हे उल्हासनगरात परतले. गेल्या ८ वर्षापासून त्या उल्हासनगरात राहत आहेत. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांना काही रक्कम भेट स्वरुपात आली. ही रक्कम एकूण २८ लाख रुपये होती. ही रक्कम बिना यांनी बँकेत जमा केली. या रक्कमेतून काहीतरी सकारात्मक काम करण्याचे त्यांच्या मनी आली. त्यांनी सर्वप्रथम एका स्मशानभूमीची रंगरंगोटी केली. त्यानंतर सामाजिक बांधिलकीतून रंगरंगोटीचा चंगच बांधला. शाळा, अनाथालये यांची रंगरंगोटी केली आहे. त्यावर आत्तापर्यंत २७ लाख रुपये खर्च झाला आहे. त्यांचे पती कुमार वाधवा यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी पतीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण वालघूनी रेल्वे उड्डाणपूलाचे संरक्षक कठडे रंगविण्यास सुरु केले. गेल्या दोन दिवसापासून बिना व त्यांचा मदतनीस जॉन गोयल आणि सईद खान हे रंगरंगोटीचे काम करीत आहे. संपूर्ण पूल त्यांनी रंगवून टाकला आहे. गुलाबी आणि लाल रंगाने पूलाची रंगरंगोटी केल्याने पूलाचे रुपडे पालटले आहे. यापूढेही असे काम करण्याचा मानस बिना यांनी व्यक्त केला आहे.