ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना राष्ट्रपती पदक

By जितेंद्र कालेकर | Published: January 25, 2024 07:46 PM2024-01-25T19:46:25+5:302024-01-25T19:46:31+5:30

औरंगाबादमधील परळी आणि करमाडमध्येही त्यांनी आंतरराज्यीय बनावट नोटांचे रॅकेटही पकडले होते.

Presidents Medal to Madhukar Kad Senior Police Inspector of Thane | ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना राष्ट्रपती पदक

ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना राष्ट्रपती पदक

ठाणे : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. कड यांना यापूर्वीही उत्कृष्ठ पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित केले आहे. आपल्या कायार्ची दखल घेतल्याबद्दल वरिष्ठ पाेलिस अधिकारी यांचे आपण आभारी असल्याची प्रतिक्रीया कड यांनी व्यक्त केली.

कड यांची १९९२ मध्ये उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. १९९३ ते २००३ दरम्यान ते अतिसंवेदनशील लकडगंज पोलिस स्टेशन, नागपूर आणि खंडणी विरोधी पथक तसेच नागपूर शहरात असतांना कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय कुशलतेने त्यांनी हाताळली होती. खून, खंडणी प्रकरण, घरफोडी, फसवणूकीसारख्या गुन्हयांमधील अनेक आरोपींना त्यांनी जेरबंद केले होते. गुन्हेगारी टोळया आणि अमली पदाथार्ंचाही त्यांनी नाश केला होता. त्यांच्या तपासामुळे ३० कुख्यात गुन्हेगारांना कारावासाची शिक्षा मिळाली. औरंगाबादमधील परळी आणि करमाडमध्येही त्यांनी आंतरराज्यीय बनावट नोटांचे रॅकेटही पकडले होते. औरंगाबादच्या शस्त्र साठा प्रकरणाचा छडा तसेच दहशतवाद विरोधी पकात (एटीएस) मुंबईमध्ये असतांना मुंबई झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरण, एमपीए नाशिक रेकी प्रकरण, जंगली महाराज रोड पुणे बॉम्ब स्फोट , नक्षलवादी प्रकरणातील आरोपींना अटक करण्यातही त्यांची महत्वाची भूमीका होती.

नाशिक आणि ठाणे शहरात नेमणूकीस असतांना जातीयदृष्टया संवेदनशील भद्रकाली, अंबड, पंचवटी आणि मुंब्रा पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून जातीय सलोखा राखण्यात त्यांना यश आले होते. चार खूनाच्या गुन्हयांमधील आरोपींना त्यांच्या तपासामुळे शिक्षाही झाली.
 
यापूर्वीही राष्ट्रपती पदक  

उल्लेखनीय कामगिरीबाबत कड यांना ५७१ बक्षिसे मिळाली. त्यातील चार लाख २० हजार ४२५ रोख स्वरुपाची तर ५१४ सी नोटस आणि ४२ प्रशंसापत्र मिळाली. २००८ मध्ये पोलिस महासंचालकांचे पोलिस पदक आणि २०१७ मध्ये उत्कृष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पदकही त्यांना प्राप्त झाले. मुंब्रा पोलिस ठाण्यात कोरोना काळातही त्यांची उत्कृष्ठ कामगिरी झाली. आतापर्यंतच्या सर्वच कार्याची दखल घेत त्यांना यंदा उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे.

Web Title: Presidents Medal to Madhukar Kad Senior Police Inspector of Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे